esakal | क्रिकेट सट्ट्यातील मास्टरमाइंड भूमिगत; पोलिसांकडून शोध; कोट्यवधींची उलाढाल गुलदस्त्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Master mind ofMaster mind of cricket bookies gone under ground in wardha  cricket bookies gone under ground in wardha

पोपट लाइन डब्ब्यात क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक होते. त्या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी झालेल्या उलाढालीपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली होती. तर, वणी येथील बिल्डरच्या कार्यालयावर छापा टाकून क्रिकेट जुगाराचा पर्दाफाश करण्यात आला. फकिर असलेला व्यक्ती अल्पावधीत कोट्यवधी झाल्याचे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

क्रिकेट सट्ट्यातील मास्टरमाइंड भूमिगत; पोलिसांकडून शोध; कोट्यवधींची उलाढाल गुलदस्त्यात

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : आयपीएल सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून यवतमाळ शहर उदयास आले आहे. पोलिस बुकींच्या घरापर्यंत प्रथमच पोहोचलेत. मात्र, क्रिकेट सट्ट्यातील मास्टरमाइंड अजूनही भूमिगतच आहेत. पोलिस मागावर असले तरी बुकी हातात लागत नाही.

"आयपीएल' क्रिकेट स्पर्धेदरम्यान अमरावती पोलिस क्रिकेट बुकींच्या शोधात यवतमाळात येऊन गेलेत. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी शहरात एकाच वेळी नऊ ठिकाणी छापासत्र राबविले होते. त्यात बडा मासा अडकला नाही. त्यानंतर 'बिग बॅश लीग टी-ट्‌वेंटी' या क्रिकेट सामन्यांवर यवतमाळातील 'बुकीं'कडून सट्टा स्वीकारणे सुरू असताना पोलिसांनी आठवडाबाजार परिसरात छापा टाकून चौघांना ताब्यात घेत एक हॉट-लाइन व १६ मोबाईल कनेक्‍शन असलेली (पोपट लाइन डब्बा), एक लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही, २५ मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला होता. 

पोपट लाइन डब्ब्यात क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक होते. त्या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी झालेल्या उलाढालीपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली होती. तर, वणी येथील बिल्डरच्या कार्यालयावर छापा टाकून क्रिकेट जुगाराचा पर्दाफाश करण्यात आला. फकिर असलेला व्यक्ती अल्पावधीत कोट्यवधी झाल्याचे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

जम्मूचा सट्टा पोलिसांनाही माहिती होता. केवळ आर्थिक उलाढालीमुळे खाकीचे हात दूर होते, अशी चर्चा पोलिस वर्तुळात दबक्‍या आवाजात अजूनही सुरू आहे. पोलिसांच्या जाळ्या अडकलेले लहान मासे आहेत. बडे मासे पोलिसांच्या हाती लागल्यास कोट्यवधींच्या उलाढालीवर पडलेला पडदा उघडण्याची शक्‍यता आहे.

जुगारी झाले कर्जबाजारी

क्रिकेटमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे या खेळातील रंगत आणखीच वाढते. नेमकी हीच रंगत क्रिकेट बुकींकडून "कॅश' केली जाते. कमी वेळात लाखो रुपये मिळविण्याच्या हव्यासापोटी कित्येक जुगारी कर्जबाजारी झाले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image