घोटाळ्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर  : शहरासह राज्यात एमबीएची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया भगवान भरोसे सुरू असल्याचे चित्र आहे. सीईटी सेल आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग दोघेही जबाबदारीपासून दूर पळत असल्याचे चित्र आहे. एवढा मोठा घोळ बाहेर आला असताना, प्रवेश प्रक्रिया थांबविलेली नाही. दुसरीकडे बुधवारी (ता.24) दुसऱ्या फेरीचे ऑप्शन भरायचे होते. मात्र, संकेतस्थळावर ऑप्शन भरण्यासाठी कुठलाच पर्याय नसल्याचे दिसून आले. यावर दोन्ही विभागांकडून सुनावणी होत नसल्याने या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा रोष निर्माण झाल्याचे चित्र आहे.

एमबीए प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट (एमएचसीईटी), एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट एडमिशन्स (एटमा), मॅनेजमेंट एप्टिट्यूड टेस्ट ( मॅट), कॉमन मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट (सी-मॅट) सारख्या कॉमन एन्टरन्स टेस्टमधील गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. नोंदणीनंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. प्रथम तात्पुरती तर त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाते. मात्र, अंतिम गुणवत्ता यादीत काही विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आले. याच आधारावर त्यांचा महाविद्यालयात प्रवेश करण्यात आल्याचे चार वर्षात 99.99 पर्सेंटाईल गुण आजपर्यंत मिळाले नसताना, या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांना 99.99 पर्सेंटाईल मिळालेच कसे, हा प्रश्‍न आहे. प्रकरण लक्षात येताच सीईटी सेलचे अध्यक्ष आनंद रायते यांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर त्यांनी 134 विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. विशेष म्हणजे या प्रकरणात सहसंचालक डॉ. महाजन यांना ऍडमिशन रेग्युलेशन ऍथॉरिटीसमोर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, असे असताना, सीईटी सेल आणि प्रवेश समितीमार्फत अद्याप पाऊल उचलण्यात आले नसल्याचे दिसते. याउलट प्रक्रियेत ऑप्शन भरता येत नसल्याने विद्यार्थ्यांना डीटीई आणि सीईटी सेलचे हेलपाटे घालावे लागत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MBA education news