एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

MBBS students suicide at sangrampur buldhana
MBBS students suicide at sangrampur buldhana

संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील पळशी झाशी येथील 20 वर्षीय विद्यार्थ्यांने गोंदिया येथे रविवारी (ता. 24) गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिष भानुदास राहणे असे त्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे गोंदिया येथे शिक्षण घेत होता. 

प्राप्त माहितीनुसार, आशिष हा शांत आणि संयमी स्वभावाचा शेतकरी कुटूंबातून होता. त्याचे वडील भानुदास राहणे यांनी शेती करीत मुलांना उच्च शिक्षण देण्यावर भर दिला आहे. म्हणूनच मोठ्या मुलाचे एमबीबीएस पूर्ण झाले. दुसरा इंजिनियर झाला आणि हा तिसरा ही एमबीबीएससाठी शिक्षण घेत होता. गत वर्षात शेतात काम करीत असताना वीज पडल्याने त्यात भानुदास राहणे जखमी झाले होते. तो आघात सहन करूनही मोठ्या हिंमतीने त्यांचे मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू होते. असे असताना आशिषने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजलेले नाही. आशिष गोंदिया येथील सिव्हिल लाईन बालाजी चौकात भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com