"मेडा'ने अडवले अंगणवाड्यातील "सौर प्रकाश'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : जिल्ह्यातील अडीच हजारांवर अंगणवाड्यांपैकी 155 अंगणवाड्या खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून सौर पॅनल लावण्यात येणार होते. महिला बालकल्याण विभागाने यासाठी मेडाला एक कोटीचा निधी दिला. वर्षभर होत असताना साधी कामाच्या हालचालीही सुरू झाल्या नाही.
या अंगणवाड्यांमध्ये सौर पॅनल, इमारत, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज आणि लहान बालकांना संगोपनाच्या दृष्टीने इतर शैक्षणिक सुविधा देण्यात येणार होत्या. तसेच या स्मार्टपणाचा लाभ उचलून या अंगणवाड्या आयएसओ मानांकनच्या वर्गवारीत आणण्याचे धोरण जिल्हा परिषदेचे होते. मात्र, या निधीचा अद्याप फायदा झाला नाही. यावर काम सुरू असल्याचे इतकेच उत्तर या कार्यालयाकडून प्राप्त होत आहे. एका पॅनलसाठी साधारणत: तीन ते चार लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सौर पॅनल न लागल्याने संबंधित सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या, असा प्रश्‍न जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाला पडला आहे. 2017 ला नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सौर पॅनल संयंत्राने जोडून प्रकाशमान करण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांना खनिज प्रतिष्ठान कार्यक्रमातून निधी देण्याचे ठरले होते. तशी सर्व प्रक्रियासुद्धा पार पडली. हा निधीही मेढाच्या तिजोरीत वळता करण्यात आला. महिला बालकल्याण विभागाने प्राधान्यक्रमाने या कार्यालयाला अंगणवाडी केंद्राच्या याद्याही सोपविल्यात. परंतु, निधी देऊनही हे संयंत्रच न बसल्याने अंगणवाड्यांचे स्मार्ट होण्याचे स्वप्नच भंगलेले दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com