मेडिकलमधून डॉक्‍टरांची निर्यात?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - जळगाव येथे राज्यातील पहिल्या मेडिकल हबचा मार्ग मोकळा झाला असून नुकतेच भारतीय वैद्यक परिषदेनेही मान्यता दिली आहे. राज्य सरकारने १२५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. एकाच छताखाली असलेल्या या मेडिकल हबमध्ये १०० विद्यार्थी संख्येचे ॲल्युपॅथी मेडिकल कॉलेज, १०० विद्यार्थी संख्या असलेले आयुर्वेद कॉलेज, ५० विद्यार्थी संख्या असलेले दंत महाविद्यालय आणि होमिओपॅथी कॉलेजला मान्यता मिळाली. मात्र, यापूर्वीपासूनच्या बारामतीमध्ये ४०० कोटी रुपये खर्चुन इमारत तयार असताना येथे मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले नाही.

नागपूर - जळगाव येथे राज्यातील पहिल्या मेडिकल हबचा मार्ग मोकळा झाला असून नुकतेच भारतीय वैद्यक परिषदेनेही मान्यता दिली आहे. राज्य सरकारने १२५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. एकाच छताखाली असलेल्या या मेडिकल हबमध्ये १०० विद्यार्थी संख्येचे ॲल्युपॅथी मेडिकल कॉलेज, १०० विद्यार्थी संख्या असलेले आयुर्वेद कॉलेज, ५० विद्यार्थी संख्या असलेले दंत महाविद्यालय आणि होमिओपॅथी कॉलेजला मान्यता मिळाली. मात्र, यापूर्वीपासूनच्या बारामतीमध्ये ४०० कोटी रुपये खर्चुन इमारत तयार असताना येथे मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले नाही. तर विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपुरातील मेडिकल कॉलेजवर अवकळा पसरली असून याकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा मुंबईच्या मेडिकल वर्तुळात सुरू आहे. 

राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील पहिल्या मेडिकल हबला मंजुरी दिल्यानंतर हे हब जळगाव जिल्ह्यात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या मेडिकल हबध्ये रुग्णांना सर्व प्रकारच्या पॅथीच्या तसेच  दंतच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. मात्र, खरा प्रश्‍न वैद्यकीय शिक्षकांचा आहे. विदर्भात गोंदिया आणि चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पन्नासच्या वर डॉक्‍टरांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु, भारतीय वैद्यक परिषदेचे निरीक्षण संपताच बदलून गेलेल्या ७५ टक्के डॉक्‍टर पुन्हा बॅक टू मेडिकल आले आहेत. यामुळे विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर अवकळा पसरली आहे. याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

जळगावमध्ये राज्य सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयाचा मोठा फायदा, उत्तर-महाराष्ट्रातील  जनतेला होणार आहे. उत्तर-महाराष्ट्रातल्या लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव मेडिकल हब उभारावे, परंतु यासाठी मेडिकलमधील डॉक्‍टराच्या बदल्या जळगावात करू नये असाही सूर नागपूरच्या मेडिकलमध्ये रंगलेल्या चर्चेत होता. 

बारामतीच्या कॉलेजचं काय?
राज्य शासनाने चंद्रपूर, गोंदिया आणि बारामतीमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्यासंदर्भात २०१५ मध्येच मंजुरी मिळाली. त्यानुसार बारामतीमध्ये सर्वांत आधी मेडिकल कॉलेज सुरू होईल, असे चित्र असताना बारामतीमध्ये मेडिकल कॉलेजसाठी उभारण्यात आलेली २०० कोटींची इमारत शोभेची वास्तू म्हणून उभी आहे. याकडे सरकारचे साफ दुर्लक्ष आहे.

Web Title: medical doctor export