"एम्स'मध्ये मेडिकलच्या डॉक्‍टरांची नियुक्ती

file photo
file photo

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपुरात सुरू झाली. 2017-18 मध्ये पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झाल्यानंतर नागपूरच्या एम्ससाठी 248 पदांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी निवड प्रक्रिया होऊन मेडिकलमधील डॉक्‍टर एम्समध्ये रुजू होतील, असे वाटत होते. परंतु, तसे झाले नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीत मेडिकलमध्ये कार्यरत वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती होत आहे. यामुळे भविष्यात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षकांची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या पदभरतीत नागपूरच्या मेडिकलमधील डॉ. मीना वाजपेयी यांची तर यवतमाळचे प्रभारी अधिष्ठाता पदावर कार्यरत डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची नियुक्ती झाली. याशिवाय डॉ. विकास मेश्राम, डॉ. बिपीनचंद्र तिरपुडे, डॉ. हृषिकेश पाठक, डॉ. मंदार साने, डॉ. विजयश्री देवतळे, डॉ. राहुल नारंग, डॉ. नीता गाडे, डॉ. विवेक हाडा यांचीही नियुक्ती झाली. सध्या एम्समध्ये दुसऱ्या टप्प्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तूर्तास मेडिकलमध्येच वर्ग होत असले तरी लवकरच 40 हजार स्वेअर फूट जागा वापराचा अधिकार एम्सला दिला आहे. शैक्षणिक सत्रासाठी तीन लेक्‍चर हॉल, तीन प्रयोगशाळा, अधिकाऱ्यांना निवासासाठी अधिष्ठातांच्या बंगल्यासह पाच बंगले आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी आणखी तीन बंगले हस्तांतरित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com