निंदनीय! वैद्यकीय अधिकाऱ्यांना "ऍप्रॉन'चा विटाळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमात शिक्षक, विद्यार्थी किंवा तंत्रज्ञांनी "ऍप्रॉन' वापरावा, असे वैद्यकीय क्षेत्रातील तत्त्व सांगते. परंतु, मेडिकलमधील वैद्यकीय अधीक्षक कक्षात एकही वैद्यकीय अधिकारी ऍप्रॉन घालत नाही. विशेष असे की, मेडिकलमधील विद्यार्थ्यांनाही "ऍप्रॉन'चा विटाळ असल्याचे चित्र परिसरात दिसून येते. 

यापूर्वी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्‍टर, विद्यार्थी, शिक्षक तसेच तंत्रज्ञांनी "ऍप्रॉन' न घातल्यामुळे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांनी विद्यार्थ्यांसह डॉक्‍टरांना शिस्तीचे पालन करावे आणि "ऍप्रॉन' वापरावे, असे पत्र जारी केले. नव्हे, तर वैद्यकीय संचालक कार्यालयातही तशी माहिती सादर केली होती. यामुळे येथील वैद्यकीय शिक्षक, चिकित्सक, पदव्युत्तर विद्यार्थी व पदवीपूर्व विद्यार्थी "ऍप्रॉन' वापरत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, मेडिकलमध्ये वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात वीस ते पंचेवीस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यातील कॅज्युअल्टीत दोन वैद्यकीय अधिकारी तेवढे ऍप्रॉन घालत असल्याचे दृश्‍य दिसते. उर्वरित एकही वैद्यकीय अधिकारी ऍप्रॉन घालत नाही. ही बाब खुद्द अधिष्ठाता यांच्याही निदर्शनास आली आहे. यासंदर्भात मेडिकल प्रशासन ऍप्रॉन न वापरणारे वैद्यकीय अधिकारी तसेच विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार की नाही, असा सवाल पुढे येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical officer away from apron