बाभुळगावात वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी 

प्रविण दांडगे
सोमवार, 9 जुलै 2018

आता पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी दोन असूनही रात्रीला येथे कोणेही हजर नसल्याने रुग्णांना याचा त्रास होतो.

अकोला (बाभुळगाव) - येथे आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यामध्ये परीसरातील शेकडो रुग्ण सेवेचा वापर घेतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी राहते. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने याचा परीणाम रुग्णसेवेवर होत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहण्याची ॲलर्जी दिसून येत आहे. 

आता पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी दोन असूनही रात्रीला येथे कोणेही हजर नसल्याने रुग्णांना याचा त्रास होतो. येथील वैद्यकीय अधिकारी वरिष्ठांच्या नियमांची पायमल्ली करुन स्वतःचे घोडे हाणन्याचे काम करीत असल्याचा आरोप होत आहे. शासनाने त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन राहण्याची सोय करुन दिली मात्र येथे वैद्यकीय अधिकारी रात्रीला कोणीही हजर नसतो. त्यामुळे येथे रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. 
रुग्णकल्याण समितीच्या व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे येथील निवासस्थाने शोभेची वास्तु बनली आहे. वैद्यकीय अधिकारी दोन असूनही दोनपैकी एकही रात्र पाळीला हजर राहत नाहीत. एखादा गंभीर रुग्ण जर रात्री पी.एच.सी. येथे हजर नसल्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतो. 

कर्मचारी करतात अपडाऊन - 
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे दररोज अप-डाऊन करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस रुग्णाची गर्दी पाहूनही एकही अधिकारी हा मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत याकळे डी.एच.ओ. व संबधित अधिकारी यांनी लक्ष देतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

जिल्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांना आदेशीत केले आहे. एकाने तरी पी.एच सी.ला फिल्डवर उपस्थित राहावे असे आदेश लेखी सूचना दिल्या आहेत. तरी या संदर्भाची दखल घेऊन चौकशी करण्यात येईल. 
- श्री. जाधव, प्रभारी, डी.एच.ओ. अकोला. 

मला अजून पातूर तालुक्याचा चार्ज मीळाला नाही मला तालुक्याचे काम पाहण्याची जबाबदारी दिली आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. - हाडोळे मॅडम, टी.एच.ओ. पातूर.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Medical officers do not attend the headquarters at Babhulgaon