मेडिकलमध्ये बोन मॅरो रजिस्ट्री

केवल जीवनतारे -सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नागपूर - अवघ्या पाच वर्षांच्या वयात ‘त्याला’ रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. आदिवासी भागातील हा चिमुकला होता. उपचारासाठी पैसे नव्हते. या आजारावर ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण हा एकच उपाय होता. त्याच्या कुटुंबात बोन मॅरो देऊ शकेल, असा दाताच नव्हता. अखेर विदर्भातील आदिवासी चिमुकल्यावर मुंबईच्या डॉक्‍टरांनी बोन मॅरो देणारा दाता शोधला. चिमुकल्यावर बोन मॅरो करण्यात आले. पाच वर्षांच्या चिमुकल्याला पुर्नजन्म मिळाला. कॅन्सरवर चिमुकल्याने मात केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात चार ठिकाणी ‘बोन मॅरो’ची रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेतला.

नागपूर - अवघ्या पाच वर्षांच्या वयात ‘त्याला’ रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. आदिवासी भागातील हा चिमुकला होता. उपचारासाठी पैसे नव्हते. या आजारावर ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण हा एकच उपाय होता. त्याच्या कुटुंबात बोन मॅरो देऊ शकेल, असा दाताच नव्हता. अखेर विदर्भातील आदिवासी चिमुकल्यावर मुंबईच्या डॉक्‍टरांनी बोन मॅरो देणारा दाता शोधला. चिमुकल्यावर बोन मॅरो करण्यात आले. पाच वर्षांच्या चिमुकल्याला पुर्नजन्म मिळाला. कॅन्सरवर चिमुकल्याने मात केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात चार ठिकाणी ‘बोन मॅरो’ची रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मध्ये बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्यात येणार आहे.

गरीब कुटुंबातील व्यक्तीला कॅन्सरसारख्या आजारांवर बोन मॅरो उपलब्ध करून देणे शक्‍य नसते. अशावेळी रक्ताचे नाते नसलेला बोन मॅरो दाता बाहेरून शोधण्याशिवाय पर्याय नसतो. तत्काळ बोन मॅरो दाता मिळणे अशक्‍य असल्याने राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि मुंबई येथे बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुंबईत बोन मॅरो प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला. रजिस्ट्री तयार झाल्यानंतर रुग्णांसाठी बोन मॅरो उपलब्ध करण्यासाठी प्रत्यक्ष दात्याला काही पैसे द्यावे लागणार नाहीत. रक्ताचे नाते नसलेला बोन मॅरो जुळणारा दाता सापडल्यानतंर मात्र त्याने माघार घेऊ नये, एवढीच सक्ती यात असणार आहे.   

सध्यातरी राज्यात बोन मॅरो शोधून देणारी रजिस्ट्री मोफत चालवली जात नाही. यामुळेच ‘टाटा ट्रस्ट’ यांच्या मदतीने बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्यात येत आहे. दाता यांचा पांढऱ्या पेशींचा गट (एचएलए टायपिंग- ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन) जुळणे आवश्‍यक असते. या एचएलए टायपिंगचा खर्च मोठा असतो. त्यामुळे बोन मॅरोसाठी दाता शोधण्याचा खर्च वाढतो. हा खर्च टाटा ट्रस्टतर्फे केला जाईल. नुकतेच मुंबईत झालेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वाहणे उपस्थित होत्या. 

पन्नास हजार दात्यांची रजिस्ट्री
राज्यात चार पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या चार ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बोन मॅरो रजिस्ट्रीतून सुमारे ५० हजार बोन मॅरो दात्यांची रजिस्ट्री तयार करण्यात येईल. राज्यात बीपीएल तसेच गरिबांना गरज पडताच तत्काळ रजिस्ट्रीतून दात्याशी संपर्क साधला जाईल.

Web Title: Medical Registry of Bone mero