esakal | मेहकर : जीर्ण टाकी उठली जिवावर, नागरिकांच्या जिवाला धोका
sakal

बोलून बातमी शोधा

मेहकर : जीर्ण टाकी उठली जिवावर,  नागरिकांच्या जिवाला धोका

मेहकर : जीर्ण टाकी उठली जिवावर, नागरिकांच्या जिवाला धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोमेधर : मेहकर तालुक्यातील लोणी काळे गावातील पाण्याची टाकी अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवासी सदर धोकादायक पाण्याची टाकी पाडण्यात येऊन पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करीत आहेत. परंतु, संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. जीव गेल्यानंतर शासनाला जाग येणार का असा सवाल आता येथील नागरिक करत आहे.

लोणी काळे हे छोटेसे गाव अजून येथे ५० हजार लीटर क्षमतेची ही टाकी गेल्या ३५ ते ४० वर्षाअगोदर बांधली असून तिचे सर्व बीम, कॉलम ढासळलेले आहे. गावात कुठल्याही प्रकारची नळयोजना नाही. गावाला नळाचे पाणी नाही. या टाकीचा गावाला फायदा नाही. सदर टाकी पाडण्याबाबत सातत्याने ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली. तरी याकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.

हेही वाचा: चोरी करायला गेले अन् हसं करुन आले; पाहा भन्नाट व्हिडीओ

मानवाच्या मूलभूत गरजा वीज, पाणी आणि रस्ते या असून काही गावात केवळ नावालाच पाण्याच्या टाक्या उभ्या आहे. टाकीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची टाकी नावाला, पाणी नाही गावाला आणि धोका जिवाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

जीर्ण झालेल्या टाकीच्या भोवती सात-आठ कुटुंब राहतात. सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून, शेतात पाणी साचते आहे. रस्ते खरडून जात आहे तर कुठे पूल सुद्धा तुटत आहे. अशा गंभीर परिस्थितीत टाकी कधी घरावर कोसळणार हे सांगता येत नाही याची चिंता नेहमीच येथील नागरिकांना असते. याबाबत शासनाने काहीतरी पर्यायी व्यवस्था करून या टाकीची विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: ‘नाना’ आले अन् गटबाजीला खतपाणी घालून गेले!

ग्रामपंचायतीला वारंवार मागणी, अर्ज सुद्धा सादर करण्यात आले आहे. परंतु, ग्रामपंचायत प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. जीर्ण टाकी जर कोसळून हानी झाली तर नुकसानीची भरपाई कोण देणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सदर टाकीमुळे परिसरातील ज्ञानेश्वर पोपळघट, रामचंद्र बोडके, गजानन आल्हाट या दोन-तीन कुटुंबाला मोठ्या प्रमाणात या टाकी पासून धोका निर्माण झाला आहे.

जीर्ण झालेल्या टाकीचा गेल्या अनेक वर्षांपासून वापर नाही. सदर टाकीच्या परिसरातच राहणे असून, दगड मातीच्या घरात सहा सदस्य आहे. जोरदार पाऊस आणि वादळी वारे आले की, नेहमीच टाकी कोसळणार याची चिंता असते. त्यामुळे सदर टाकी पाडण्याबाबत ग्रामपंचायत तसेच शासनाने दखल घेणे गरजेचे आहे.

- ज्ञानेश्‍वर पोपळघट, ग्रामस्थ, लोणी काळे.

loading image
go to top