

Buldhana Mehkar Quarry Accident Claims Lives Of Two Children Near Koradi Project In Tragic Drowning Incident
esakal
मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी गावापासून नजिक कोराडी मध्यम प्रकल्पा जवळ पाणीपुरवठा विहिरीजवळ पाण्याने भरलेली खदाणी आहे. यात उतरून पाय धूत असताना दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. आयान राजू शेख आणि त्यांचा मावस भाऊ आवेद इब्राहिम शेख असे मृतकाचे नाव असून दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.