

Melghat Tiger Reserve News 1500 MW Adani Hydropower Project Raises Concerns Over Forest Loss and Wildlife Habitat
sakal
अमरावती: कर्जतमधील भीमाशंकरपाठोपाठ आता मेळघाटामधील जंगलराजीवर कुऱ्हाड चालण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आडनदी येथे १,५०० मेगावॉट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प होणार असून, त्यासाठी २४० हेक्टर जंगलाची तोड करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली. या संभाव्य जंगलतोडीला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी चालविली आहे.