Melghat Fruits : मेळघाटातील फळांची गोडी पोहोचली महानगरांत

सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांनी अतिशय सकारात्मक राहून मेहनतीच्या जोरावर फळ उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Melon and watermelon
Melon and watermelonsakal

चिखलदरा - मेळघाट हे कुपोषण आणि विविध समस्यांचा भूभाग असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी येथे स्थायिक झालेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांनी अतिशय सकारात्मक राहून मेहनतीच्या जोरावर फळ उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या विविध प्रजातींच्या खरबूज तसेच कलिंगडांना मुंबई- पुण्यात चांगली मागणी आहे. येथील फळांना महानगरांमध्ये स्थान मिळवून देण्यात कोल्हे दांपत्याचा सिंहाचा वाटा आहे.

इंदूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धारणीपासून तीन किलोमीटर अंतरावर कोलूपूर येथे झाडाखाली बसून स्वतःच्या शेतातील उत्पादने विकण्याचा दहा वर्षांपासूनचा नेम डॉ.कोल्हे यांनी कायम ठेवला आहे. त्यांच्या या श्रमाचे चीज झाले आहे. त्यांनी शेतात पिकविलेले खरबूज व कलिंगडासह सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या आंब्यांनाही मोठी मागणी आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, इंदूर, धारणीसह अन्य शहरांत ही फळे पाठविली जात आहेत. कोल्हे दांपत्यासह त्यांचा मुलगा डॉ. राम कोल्हे, रोहित कोल्हे, सून पूजा कोल्हे या सर्वांनी शेतीच्या कामात वाहून घेतले आहे.

आदिवासी बांधवांना मार्गदर्शन

मेळघाटातील कुपोषण दूर करायचे असेल तर प्रथम लहान मुलांना पोटभर अन्न व स्थानिकांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. औषधोपचारापेक्षाही अन्न महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपण या ठिकाणी आधुनिक शेती करीत आहोत. येथे सोयाबीन, कापूस, हळद, ऊस, टरबूज, खरबूज, पांढरा चना, आंबा, लिंबू असे अनेक पिके घेतली जातात.

आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करतो. त्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे या एकमेव उद्देशाने आपण मेळघाटात विविध प्रयोग करीत आहोत. चांगल्या दर्जाची फळे येथे पिकत आहेत, असे कोल्हे कुटुंबीयांनी सांगितले.

या ठिकाणी पाच प्रकारच्या सीडलेस कलिंगडांचे उत्पादित केले जातात. पिवळ्या रंगाचे कलिंगडही आहे. दिसायला आकर्षक आणि खायला साखरेसारखे गोड असल्यामुळे येणारे - जाणारे लोक या ठिकाणी थांबून आवर्जून खरेदी करतात. आंब्यात दशहरी, केशर, लंगडा, आम्रपाली असे विविध जातीचे आंबे सुद्धा या ठिकाणी उत्पादित केले जातात.डॉ. कोल्हे यांच्या शेतीतील विविध प्रयोग पाहून अनेक शेतकऱ्यांनी प्रेरित होऊन आधुनिक शेती पद्धती सुरू केली आहे.

सध्या या फळांवर प्रक्रिया करून ‘ड्राय क्यूब’ तयार केले जातात. या क्यूबला आपण कितीही दिवस साठवून ठेवू शकतो. मात्र तरीही रंग आणि चव बदलत नाही. आता या खरबूज व कलिंगडापासून आइस्क्रीम व रस तसेच मिल्कशेक बनवणे सुरू आहे.

- डॉ. राम कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते, मेळघाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com