esakal | अमरावती : मेळघाटातील पशुधन वाऱ्यावर; पशुधन अधिकाऱ्यांच्या १३ जागा रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : मेळघाटातील पशुधन वाऱ्यावर; १३ जागा रिक्त

अमरावती : मेळघाटातील पशुधन वाऱ्यावर; १३ जागा रिक्त

sakal_logo
By
मोहन गायन

जामली (जि. अमरावती) : जिल्हा परिषद अंतर्गत मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यातील पशुधन अधिकाऱ्यांची एकूण १८ पदे असताना आजघडीला धारणीत ३ व चिखलदरात २ डॉक्टर कार्यरत आहेत. १३ पशुधन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे येथील पशुधन शासनाने वाऱ्यावर सोडले की काय, असा प्रश्न मेळघाटातील पशुपालकांना पडला आहे.

मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांतील पशुधनाची संख्या दोन ते अडीच लाखांच्या घरात आहे. असे असताना चिखलदरा तालुक्याचे पशुधन अधिकारी हे प्रभारी आहेत तसेच त्यांच्याकडे अनेक गावांतील दवाखान्यांचा प्रभार आहे. डॉ. विजयकर यांच्याकडे टेम्ब्रूसोंडा, तेलखार व राहू या गावाचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी कसरत करावी लागते, त्यातूनच कोणत्याही रुग्णालयात वेळेवर पोहोचणे त्यांना शक्य होत नाही.

हेही वाचा: नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

पावसाळ्यात विविध आजारांनी सध्या तोंड वर काढले आहे. त्यात तोंडखुरी, पायखुरी, एक टांग्या, गर्भपात, हगवण, कावीळ, सर्दी, खोकला, ताप अशा रोगांनी पशुधन ग्रस्त आहे. शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लसीकरण, जनावरांना टॅग लावणे तसेच सर्व माहिती ऑनलाइन करून शासनाला पाठविणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. पण शासनाला याची माहिती वेळेवर पोहोचत नसल्यामुळे पशुमालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

मेळघाटात व्याघ्रप्रकल्पातील जंगल असल्यामुळे येथे पाळीव प्राणी तसेच जंगली प्राणी यात नेहमी संघर्ष होत असून कित्येकदा वाघ, बिबटकडून पाळीव प्राण्यांना जखमी करण्यात येते किंवा त्यांची शिकार होत असते. त्याकरिता पशुधन मालकांना वनविभागाकडून नुकसानभरपाईची तरतूद आहे. पण पशुधन अधिकारी वेळेवर मिळत नसल्यामुळे मेलेल्या जनावरांचा मूल्यमापन करून जनावर किती रुपयांचा होता हा दाखला पाहिजे असतो. पण तो वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी या नुकसानभरपाईपासून सुद्धा वंचित राहतो. वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व त्वरित रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी आता मेळघाटात जोर धरत आहे.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

पशुधन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत मी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. लवकरच मेळघाटात रिक्त पदे भरण्यात येतील.
- विजय राहटे, जिल्हा पशुधन अधिकारी, अमरावती
loading image
go to top