निवडणुकीसाठी मेळघाट सज्ज 

file photo
file photo

अमरावती : विधानसभेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. मेळघाटातील मतदान अधिकाऱ्यांची चमू रवाना झालेली आहे, असे सांगत या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आग्रही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी (ता.19) पत्रपरिषदेत केले.
निवडणुकीचा जाहीर प्रचार संपताना जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीविषयी माहिती दिली. जिल्ह्यात 12 लाख 59 हजार 644 पुरुष व 11 लाख 89 हजार 373 महिला तसेच 43 इतर असे एकूण 24 लाख 49 हजार 60 मतदार आहेत. मतदान केंद्रांची मतदारसंघनिहाय संख्या धामणगावरेल्वे 372, बडनेरा 328, अमरावती 309, तिवसा 319, दर्यापूर 337, मेळघाट 353, अचलपूर 300, मोर्शी 310 अशी एकूण 2,628 आहे. पैकी ग्रामीण 1750, तर शहरी 878 केंद्र आहेत. एकूण 222 केंद्र संवेदनशील आहेत. जिल्ह्यातील एकूण 263 मतदान केंद्रांचे वेबकास्टींग केले जाणार असून त्या केंद्रांवर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाईल. आदर्श मतदान केंद्र 11 व सखी मतदान केंद्र 10 राहतील. दोन मतदान केंद्र दिव्यांग अधिकाऱ्यांकडून चालविले जातील. दिव्यांग मतदार 9,265 असून त्यांच्यासाठी 1880 व्हिलचेअरसह 2628 स्वयंसेवक नेमले जाणार आहेत. सेनादलातील मतदारांची संख्या 3282 असून त्यांच्यापर्यंत इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतपत्रिका पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 23 लाख 54 हजार 28 मतदारांपर्यंत मतदारचिठ्ठी व मतदार माहितीपुस्तिका पोहोचविण्यात आलेली आहे. मतदारचिठ्ठी ही केवळ सुविधेसाठी आहे, मतदानासाठी त्यासोबत ओळखपत्र आणणे आवश्‍यक आहे. निवडणूक पर्यावरणस्नेही ठरावी, असा निवडणूक आयोगाचा आग्रह आहे, यासाठी मतदान चमूंना कापडी पिशव्या देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनीसुद्धा प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचा वापर टाळावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. मेळघाटातील अनेक मतदानकेंद्रापर्यंत धारणीहून पोहोचण्यासाठी सहा ते साडेसहा तास लागणार असल्याने सर्वच पोलिंग पार्टी शनिवारी (ता.19) दुपारी रवाना करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मतदारांना प्रभावित करू शकणाऱ्या मतदारसंघाबाहेरच्या सेलिब्रिटी वा प्रचारकांना जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात थांबता येणार नाही, याबाबतची नोटीस संबंधितांना बजावण्यात आलेली आहे. 

कर्मचाऱ्यांना सुविधा
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मतदानानंतर मतदान साहित्य जमा करण्यासाठी रात्री उशीर होईल, त्यामुळे दुसऱ्या दिवसाची त्यांची कार्यालयातील अनुपस्थिती ही कर्तव्यकाळ मानण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com