esakal | याला म्हणतात नशीब! ऑनलाइन फ्रॉडमध्ये गेले लाखो रुपये; दिवाळीत पोलिसांनी दिली गुड न्यूज 
sakal

बोलून बातमी शोधा

men in amravati got their money back on diwali occasion

आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे काही दिवसांपूर्वी दोन व्यक्तींच्या खात्यामधून ही रक्कम बेपत्ता झाली होती. त्यामध्ये सायबर ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

याला म्हणतात नशीब! ऑनलाइन फ्रॉडमध्ये गेले लाखो रुपये; दिवाळीत पोलिसांनी दिली गुड न्यूज 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : ऑनलाइन फ्रॉडमध्ये गमावलेल्या रकमेपैकी 1 लाख 71 हजार रुपये दोन व्यक्तींना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी परत मिळाले. त्यामुळे दोघांचाही आनंद द्विगुणित झाला होता.

आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे काही दिवसांपूर्वी दोन व्यक्तींच्या खात्यामधून ही रक्कम बेपत्ता झाली होती. त्यामध्ये सायबर ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. 14 मे 2020 रोजी अथर्व श्रीकांत मुळावकर (वय 24, रा. तिरूपतीनगर, साईनगर) यांची इन्स्ट्राग्राम साइटवरून काहींशी संपर्क झाला. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

संबंधितांनी श्री. मुळावकर यांना बीटकॉइन मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यामध्ये त्यांच्याकडून 1 लाख 21 हजांरांची रोकड ऑनलाइन मागितली. यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. दुसरी घटना 24 ऑगस्ट 2020 रोजी घडली. संजय एकनाथ तायवाडे (वय 51, राजमाता कॉलनी, रहाटगाव) यांनीही सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. 

त्यांनी केलेला एअरटेल रिचार्ज न आल्याने त्यांनी गुगल सर्च करून एअरटेलच्या कस्टमर केअर क्रमांक मिळवून त्यावर संपर्क केला. त्यांना ऍनी डेस्क हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याचा सल्ला दिला. 

संजय यांनी ते ऍप्लिकेशन डाउनलोड केले असता त्यांच्या बॅंकखात्यामधून 1 लाख 19 हजार रुपये परस्पर हडपण्यात आले. त्यातही सायबर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. श्री. मुळावकर यांना त्यांच्या गेलेल्या रकमेपैकी1 लाख 21 हजार रुपये, तर तायवाडे यांना 50 हजार 11 रुपये एवढी रक्कम परत मिळाली. मिळालेल्या पैशांबद्दल सायबर संजय तायवाडे व अथर्व मुळावकर यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे यांच्या पथकाचे अभिनंदन केले.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

अनोळखी व्यक्तीने पाठविलेली लिंक किंवा सांगितलेले ऍप डाउनलोड करणे अंगलट येऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तींबरोबर ऑनलाइन व्यवहार शक्‍यतोवर टाळावे.
-प्रवीण काळे, 
पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image