esakal | अमरावतीत भरचौकात पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की; दोघांना अटक

बोलून बातमी शोधा

crime

अमरावतीत भरचौकात पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की; दोघांना अटक

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बार, रेस्टॉरंट उघडे ठेवण्यास परवानगी नाही. त्यामुळे दुचाकी आणि कारमधून देशी, विदेशी मद्यवाहतूक जोरात सुरू आहे. श्‍याम चौकात बारसमोर काहींनी दादागिरी करून पोलिस उपनिरीक्षकासोबत रस्त्यावर धक्काबुक्की केली.

हेही वाचा: शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

नेत्रपाल यशपाल कुकरेजा (वय 51) व सुरेंद्र गुरुमुखजी खत्री (वय 60, दोघेही रा. दस्तूरनगर, अमरावती), अशी अटक दोघांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितले. त्या दोघांविरुद्ध अवैध मद्यवाहतुकीसह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शहर कोतवाली ठाण्यात बुधवारी (ता. 21) गुन्हा दाखल झाला.

पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर कायंदेसह त्यांचे अन्य तीन सहकारी श्‍याम चौकात पॉइंट ड्यूटीवर असताना कलिंगा बारसमोर एमएच 27 बीयू 1816 क्रमांकाच्या दुचाकीजवळ दोघे संशयास्पद स्थितीत दिसले. त्यांनी तोंडाला मास्क बांधला नव्हता. दुचाकीच्या डिक्कीची पाहणी केली असता त्यात विदेशी मद्याच्या काही बाटल्या आढळल्या.

हेही वाचा: बोंडअळी रोखण्यासाठी प्रशासनाचा 'ऍक्‍शन प्लॅन'; 'एक गाव, एक वाण' मोहीम राबविणार

कुकरेजा आणि खत्री यांनी पोलिसांसोबत वाद घालून त्याठिकाणी असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना पळविले. धक्काबुक्की करून उपनिरीक्षकास शिवीगाळ केली, असा आरोप आहे. त्यावरून शहर कोतवाली पोलिसांनी नमूद दोघांना अटक केली.

राजकीय नेत्याचा हस्तक्षेप

पीएसआयसोबत चौकात वाद घातल्यानंतर कोतवाली ठाण्यात कारवाईसाठी आणलेल्या दोघांना सोडून द्यावे, यासाठी एका राजकीय नेत्याने वरिष्ठांसोबत संपर्क साधल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. परंतु तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ