esakal | कपाटाची चावी तयार करून गेले दोन युवक अन् कुटुंबाच्या पायाखालची सरकली जमीन 
sakal

बोलून बातमी शोधा

men theft 70 thousand rupees from home in Amravati

जुन्या कपाटाची चावी तयार करण्यासाठी म्हणून घरात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्याच कपाटातील 69 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केला. ब्रिजलाल गेमनदास मनुजा (वय 66 रा. रामपुरीकॅम्प) यांच्या निवासस्थानी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.  

कपाटाची चावी तयार करून गेले दोन युवक अन् कुटुंबाच्या पायाखालची सरकली जमीन 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः श्री. मनुजा यांचे रामलक्ष्मण संकुलात कार्यालय आहे. ते दुपारच्या सुमारास तेथून घरी आले. त्याचवेळी त्यांना दोन व्यक्ती घरातून बाहेर निघताना दिसले. त्यांनी पत्नी जस्सी यांना घरातून बाहेर पडलेल्या दोन व्यक्तींबाबत विचारणा केली असता, ते चावी तयार करण्यासाठी म्हणून आल्याचे पत्नीने त्यांना सांगितले

हेही वाचा - .विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; कारण, शाळा सुरू पण एसटी बंद

जुन्या कपाटाची चावी तयार करण्यासाठी म्हणून घरात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्याच कपाटातील 69 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केला. ब्रिजलाल गेमनदास मनुजा (वय 66 रा. रामपुरीकॅम्प) यांच्या निवासस्थानी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.  

श्री. मनुजा यांना कपाटात 69 हजार 500 रुपये असल्याची माहिती होती. त्यांनी तासाभरात पैसे सुरक्षित आहेत किंवा नाही याबाबत खात्री करण्यासाठी म्हणून ज्या कपाटाची चावी तयार केली, त्याच कपाटात बघितले असता 69 हजार 500 रुपयांची रोख रक्कम त्यांना दिसली नाही. चावी तयार करण्यासाठी आलेल्या त्या अनोळखी व्यक्तींनीच चावी तयार करताना ही रोकड लंपास केली. असा आरोप ब्रिजलाल मनुजा यांनी तक्रारीत केला. 

नक्की वाचा - "साहब, वो झोपडीमे नही आते, उनकी फोटो लगाके...

प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. 24) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. श्री. मुनजा यांच्या पत्नीने रस्त्याने जाणाऱ्या चावीवाल्याला कपाटाच्या दुरुस्तीसाठी घराच्या आवारात बोलविले. चावी तयार करताना सतत आत बाहेर करावे लागायचे, त्यामुळे घरातील महिलेने त्यांना आत बसूनच चावी तयार करण्यास सांगितले होते. त्या दोन्ही संशयितांना ही आयतीच संधी चालून आल्याने चोरी केल्याची शक्‍यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top