सायकल रॅलीतून दिला 'सेव्ह अर्थ,सेव्ह लाईफ'चा संदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

अकोला : शेकडो विद्यार्थी गुरुवारी पहाटे सायकल घेऊन रस्त्यावर उतरले अन् 'सेव्ह अर्थ, सेव्ह लाईफ'चा संदेश देत अकोलेकरांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जनजागृती केली. या लक्षवेधी उपक्रमाला निमित्त होते, 'सकाळ' आणि लहरीया बाईक्स स्टुडिओतर्फे आयोजित पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे.

अकोला : शेकडो विद्यार्थी गुरुवारी पहाटे सायकल घेऊन रस्त्यावर उतरले अन् 'सेव्ह अर्थ, सेव्ह लाईफ'चा संदेश देत अकोलेकरांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जनजागृती केली. या लक्षवेधी उपक्रमाला निमित्त होते, 'सकाळ' आणि लहरीया बाईक्स स्टुडिओतर्फे आयोजित पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे.

लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथून गुरुवारी सकाळी 7 वाजता पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी 'सकाळ' ज्युनिअर लिडर स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस म्हणून सायकली वितरीत करण्यात आल्यात. याप्रसंगी नोएल स्कूलचे संचालक अनुश मन्वर, लहरिया बाईक स्टुडिओचे संचालक सागर लहरिया, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. संतोष कुटे, नाईक होमिओपॅथी हॉस्पीटल प्रा. लि. चे संचालक डॉ. उदय नाईक, सायकलिंग प्रोत्साहन देणारे डॉ. राजेंद्र सोनोने, प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. प्रशांत मुळावकर, आयटीआयचे (मुली) प्राचार्य प्रमोद भंडारे, सकाळ वऱ्हाड आवृत्तीचे सहयोगी संपादक संदीप भारंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर मान्यवरांनी पर्यावरण जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवत सायकल रॅलीला सुरुवात केली. रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होत वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

ज्युनिअर लिडरच्या विजेत्यांना सायकल
'सकाळ' ज्युनिअर लिडर स्पर्धेच्या विजेत्यांना नोएल स्कूलचे संचालक अनुश मन्वर यांच्या सहकार्याने बक्षिस म्हणून सायकल वितरीत करण्यात आली.

यांना मिळाले सायकल बक्षिस
 विद्यार्थ्याचे नाव - शाळेचे नाव
 
आनंदी किशोर तायडे - बाल शिवाजी प्रा. शाळा
वेदांती श्रीराम देशमुख - स्कूल ऑफ स्कॉलर्स (हिंगणा)

प्रचिती प्रल्हाद नेमाडे - हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेट
गोविंद अनिल संगवी - स्कूल ऑफ स्कॉलर्स (बिर्ला)
आर्यन सुमेद बागलकर - नोएल स्कूल 

आदित्य मिलिंद सातव - होलिक्रॉस कॉन्व्हेंट

आयुष दिनेश जुनानकर - प्रभात किड्स

कार्तिक धोटे - खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेंट (गौरक्षण रोड)

असा होता रॅलीचा मार्ग

पर्यावरण जनजागृतीचा संदेश घेऊन, 'सकाळ'ची सायकल रॅली लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथून निघाली. येथून रेल्वे स्टेशन चौक, डॉ. बांभुरकर रुग्णालयमार्गे, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाईन्स चौकात पोहोचली. येथून मुख्य पोस्ट ऑफिस चौक मार्गे पुन्हा शास्त्री स्टेडियम येथे पोहोचली व पर्यावरण जनजागृती रॅलीचा समारोप करण्यात आला.

Web Title: Message from Save Money Save Life released from cycle rally