महाराष्ट्रात मॉन्सून पूर्व पाऊस सक्रिय; हवामान विभागाने दिले चिंतेत टाकणारे हे संकेत!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

रविवारी (ता.10) सायंकाळी बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अकोट तालुक्यात तर वादळी पाऊस व गारपिटीने फळ पिकांसह भाजीपाला पिकाला झोडपून काढले.

अकोला : जिल्ह्यासह राज्यभरात पूर्व मान्सून सक्रिय झाला असून, वादळी पावसासह गारपिटीचे संकेत हवामान विभागाचे दिले आहेत.

जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.10) सायंकाळी बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अकोट तालुक्यात तर वादळी पाऊस व गारपिटीने फळ पिकांसह भाजीपाला पिकाला झोडपून काढले. त्यामध्ये जवळपास अठरा गावातील सतराशे हेक्टरहून अधिक क्षेत्रावरचे पीक नुकसान झाले.

आवश्यक वाचा - Video : पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले चक्क पोलिसांचेच स्टींग ऑपरेशन

हा पाऊस म्हणजे पूर्व मान्सूनची सुरुवात असल्याचे हवामान तज्ञांचे मत होते. आता जिल्ह्यासह महाराष्ट्रात पूर्व मान्सून सक्रिय झाला असून, 13 मे पासून वळीवाच्या वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

यंदा मॉन्सून पोषक
गेल्या काही वर्षात ऋतुचक्रच बदलले आणि पूर्व मॉन्सून, मॉन्सूनची  सुरुवात लांबत गेली. गेल्या वर्षी तर, पूर्व मॉन्सूनने हजेरीच लावली नाही आणि मॉन्सूनचे आगमन सुद्धा जुलैमध्ये झाले. यावर्षी मात्र मॉन्सून सामान्य राहणार असून, मॉन्सूनचे आगमन सुद्धा योग्यवेळी होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार वातावरणात बदल सुद्धा दिसून येत असून, 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले तापमान तीन दिवसात अचानक 42 अंशावर घसरले. आर्द्रता सुद्धा 10 ते 15 टक्क्यांवरून 40 ते 73 टक्क्यांपर्यंत वाढली असून, जिल्ह्यासह विदर्भात रविवारपासून पावसाच्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे यंदा शेतीसाठी मॉन्सून पोषक राहण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

हेही वाचा - अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुद्ध सुरू आहे काम

पूर्व मॉन्सूनची सुरुवात
विदर्भासह महाराष्ट्रात पूर्व मॉन्सूनची सुरुवात झाली आहे. अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागात अवकाळी/ प्री-मॉन्सून/ वाळव्याच्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे. 
- संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meteorological Department : Pre-monsoon rains active in Maharashtra