‘माझी मेट्रो’ कोचेससाठी चार देशांचे तंत्रज्ञान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नागपूर - शहरातील मेट्रोसाठी कोचेस (डबे) निर्मितीचे काम चीनमध्ये प्रगतिपथावर आहे. ‘माझी मेट्रो’च्या कोचेससाठी चार देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या कोचेस अद्ययावत सुविधायुक्त आहेच. शिवाय आगीवर नियंत्रणासाठी इस्टिंग्युशर, प्रवाशांसाठी अलार्म आदी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. 

नागपूर - शहरातील मेट्रोसाठी कोचेस (डबे) निर्मितीचे काम चीनमध्ये प्रगतिपथावर आहे. ‘माझी मेट्रो’च्या कोचेससाठी चार देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या कोचेस अद्ययावत सुविधायुक्त आहेच. शिवाय आगीवर नियंत्रणासाठी इस्टिंग्युशर, प्रवाशांसाठी अलार्म आदी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. 

चीनमधील दालियान शहरात चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन लिमिटेड (सीआरआरसी) कंपनीत ‘माझी मेट्रो’चे कोचेस तयार होत आहे. नुकताच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी या कंपनीला भेट देऊन कोचेसची पाहणी केली. कोचेस निर्मितीसाठी चीन, जर्मनी व भारतासह चार देशांचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. जर्मनी व भारताकडून कोचेस निर्मितीस आवश्‍यक एकूण घटकांपैकी ४० टक्के घटकांचा पुरवठा होत आहे.

या कोचेसमध्ये प्रत्येक बाजूला चार पॅसेंजर सलून डोअर आणि २ कॅब डोअर आहेत. दोन डब्यांतील प्रवाशांना सुसंवादासाठी प्रशस्त जागा आहे.

लांबलचक आणि मोठ्या आकारातील खिडक्‍यांसह उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधार घेण्यासाठी मजबूत खांब, हॅण्डल्स आहेत. माहितीपर स्क्रीन, प्रकाशासाठी उत्तम एलईडी लाइट आहेत. आपात स्थितीत तातडीने लाइट लागतील, अशी  व्यवस्था कोच निर्मिती कंपनीने केली आहे. आपात स्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी कोचेसच्या उजव्या बाजूला संकटकालीन मार्ग आहे. याशिवाय पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले  सिस्टिम (पीआयडीएस), एलसीडीवर मार्गाची माहिती, पॅसेंजर सलून सर्व्हिलंस सिस्टिम (पीएसएसएस), ऑटोमॅटिक व्हाईस अनाउंसमेंट सिस्टिम (एव्हीएएस), मॉर्डन इंटेरियल पॅनल्स आदी वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. सुरक्षिततेसाठी डब्यात दोन फायर इस्टिंग्युशर, पॅसेंजर  अलार्म सुविधा, टू वे स्पीच चॅनल सुविधाही या कोचेसमध्ये राहणार आहे. गर्भवती महिला तसेच दिव्यांगांना प्राधान्याने सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन व्हीलचेअर कोचेसमध्ये राहणार आहेत.  

सुरक्षेला प्राधान्य - डॉ. दीक्षित  
तिन्ही ऋतूत २४ तास काम करणारे मेट्रो प्रकल्पातील कामगार असून त्यांच्या कार्याचे कौतुक करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मेट्रो प्रकल्प राबवत असताना कामगाराचे हित जोपासणे तितकेच महत्त्वाचे असून उंचीवर काम करणाऱ्या कामगार बांधवांना सेफ्टीनेट पुरविली जात असून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जात असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले.

Web Title: metro coach technic