मेट्रो मार्गावर एक किमीची गॅलरी - डॉ. ब्रजेश दीक्षित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नागपूर - पूर्व-पश्‍चिम मेट्रो मार्गातील रिच-तीनची कामे वेगाने पूर्ण होत आहेत. सुभाषनगर ते अंबाझरी स्टेशनपर्यंत या आठशे मीटर लांब गॅलरीला पारदर्शक काचा बसविण्यात येणार असून, पर्यटक व नागपूकरांना अंबाझरी तलावाचे सौंदर्य न्याहाळता येणार आहे. कामाचा वेग बघता जून २०१९ पर्यंत येथून मेट्रो रेल्वे धावणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी सांगितले.

सुभाषनगर, लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. सिग्नलिंग, यूपीएससी बॅटरी रूम, वॉटर टॅंक व पंपाचे काम सुरू करण्यापूर्वी डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी मंगळवारी विधिवत पूजा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रिच-तीनमध्ये दहा किमी अंतरावर १० स्टेशनचा समावेश आहे. अंबाझरी स्टेशनजवळ अम्युजमेंट पार्कची सुविधा राहणार असल्याने चिमुकल्यांनाही आनंद लुटता येणार आहे. हिंगणा डेपोमध्ये ट्रॅकसह ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हिंगणा रोडवरील सर्व स्टेशन ‘ॲक्वा थीम’वर आधारित राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकल्प संचालक महेशकुमार, वित्त संचालक शिवमाथन, महाव्यवस्थापक अनिल कोकाटे आदी होते.

पिलरवरील ट्रॅकवर ‘बुलंद’ परीक्षण
वर्धा मार्गावर दक्षिण विमानतळ ते खापरीपर्यंत जमिनीवरील ट्रॅकवरून मेट्रो रेल्वेच्या जॉय राइडला उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. आता महामेट्रोने पुढील टप्पा गाठत पिलरवरील ट्रॅकवर बुलंद या इंजिनद्वारे परीक्षण सुरू केले. दक्षिण विमानतळ ते विमानतळ या दीड किमी अंतरात पिलरवरील व्हायाडक्‍टवर मेट्रोचे ट्रॅक लावले आहे. यावर बॅटरीच्या साहाय्याने चालणाऱ्या बुलंद इंजिनद्वारे नुकतेच परीक्षण करण्यात आले. ट्रॅकचे कार्य योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याची ग्वाही बुलंदने दिली.

Web Title: Metro route gallery Dr. Brajesh Dixit