केंद्र तपासणीसाठी भरारी पथक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर - सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे अवैध गर्भपात केंद्राचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा परिषद आरोग्य समितीने जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही असा प्रकार चालतो का? याची चाचपणी करण्यासाठी भरारी पथकस्थापन करण्याचा निर्णय घेतला. 

नागपूर - सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे अवैध गर्भपात केंद्राचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा परिषद आरोग्य समितीने जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही असा प्रकार चालतो का? याची चाचपणी करण्यासाठी भरारी पथकस्थापन करण्याचा निर्णय घेतला. 

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. काही ठिकाणी अवैध गर्भलिंग परीक्षण केंद्र सुरू असल्याची ओरड होते. म्हैसाळच्या घटनेनंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयात असा प्रकार सुरू आहे का, याची तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले. त्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा जागी झाली. म्हैसाळसारख्या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये व खबरदाराची उपाय म्हणून तत्काळ 13 भरारी पथके स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक पथकात तालुका आरोग्य अधिकारी, पोलिसांचा प्रतिनिधी, उपविभागीय कार्यालय प्रतिनिधीचा समावेश राहील. त्वरित पथक गठित करून तपासणीला सुरुवात करण्याचे निर्देश आरोग्य सभापती शरद डोणेकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. या पथकाने मंगळवारपासून जिल्ह्यात तपासणी सुरू केल्याची माहिती आहे. पथकातील अधिकाऱ्यांना भेट देणाऱ्या रुग्णालयाची माहिती गुप्त ठेवण्याचे निर्देश दिले असून, भेटीपूर्वी माहिती लिक झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. 

दुर्गम भागात केंद्राची शक्‍यता 
रामटेक, पारशिवनी तालुक्‍यातील दुर्गम भागात अवैध गर्भलिंग परीक्षण केंद्र सुरू असल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या भागात तपासणीसाठी पथक जाण्याची शक्‍यता कमी व दुर्गम भाग असल्याने कारवाईची शक्‍यता कमी असते. त्यामुळे या भागात ही केंद्र असण्याची शक्‍यता आरोग्य विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

Web Title: Mhaisala illegal abortion