एमएचसीईटी पुढे ढकलली, विदर्भातील 40 हजार विद्यार्थी लटकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

आता सीईटी सेल या विभागामार्फतच पुन्हा प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेणे आवश्‍यक आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जवळपास सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

नागपूर : देशभरात 21 दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याने राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचसीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. यामुळे विदर्भातील 40 हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.
दरवर्षी चारही शाखेच्या प्रवेशासाठी या परीक्षेचे आयोजन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून केले जाते. गेल्यावर्षी सीईटी सेलमार्फत परीक्षा घेत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, मधेच यंत्रणा कोलमडल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने किल्ला लढवीत प्रक्रिया पूर्ण केली. आता सीईटी सेल या विभागामार्फतच पुन्हा प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेणे आवश्‍यक आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जवळपास सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा - अकरा विदेशींना ठेवले होम क्वॉरेंटाइनमध्ये! पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात

यात 13 ते 23 एप्रिल दरम्यान घेण्यात येणारी एमएचसीईटी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे 5 एप्रिलला प्रवेशपत्र मिळेल किंवा नाही याबाबत शंका आहे. विभागाकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. राज्यात एमएचसीईटीला 4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विदर्भातून 40 हजारावर विद्यार्थी बसणार आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHCET exam is prolong due to corona