Yavatmal News : मंत्री संजय राठोड यांची राजकीय रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत उदयास आला ‘राजकीय समन्वयाचा संजय राठोड पॅटर्न’
Minister Sanjay Rathod and dushyant chaturvedi

Minister Sanjay Rathod and dushyant chaturvedi

sakal

Updated on

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्याला प्रगल्भ, समृद्ध आणि वैचारिक राजकारणाची परंपरा लाभली आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी जिल्ह्याच्या हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची परंपरा येथे कायम राहिली आहे. याच परंपरेची प्रचिती यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळाली. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com