आर्वी : कदम प्रकरणाने डॉक्टरांमध्ये पसरली दहशत

डॉ. राणे यांनी पोलीसाला दिली माहिती पुन्हा पास्को अंतर्गत झाला गुन्हा दाखल
Minor Abortion Cases Kadam Doctors
Minor Abortion Cases Kadam Doctors sakal

आर्वी : पोट दुखत असल्यामुळे रुग्णालयात तपासा करीता आलेली अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्या चे लक्षात येताच डॉ. कालींदी राणे यांनी लगेच पोलीसांना कळवीले आणी गुरूवारी (ता.२०) पुन्हा पास्को अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला. कदम प्रकरणाने वैध्यकीय क्षेत्रात चांगलीच दहशत पसरल्याचा हा परिणाम आहे असे बोलल्या जात आहे. (Minor Abortion Cases Kadam Doctors)

Minor Abortion Cases Kadam Doctors
आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी गाठली आर्वी, घेतली झाडाझडती

दहेगाव (मुस्तफा) येथील एका अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने व गत दोन महिण्यापासुन तिला पाळी न आल्याने ती आई वडीला सोबत येथील राणे हॉस्पीटल मध्ये तपासण्याकरीता आली होती. स्त्री रोग तज्ञ डॉ. कालींदी राणे यांनी सोनोग्राफी करुन निदान केले. यात मुलीला गर्भधारणा झाल्याचे लक्षात आले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या आई वडीलाला माहित होवु न देता त्यांनी याची माहिती पोलीसात दिली. सहाय्यक निरीक्षक वंदना सोनवणे व पोलीसांनी लगेच तिला ताब्यात घेवुन येथील उपजिल्हा रुग्णालयात तिची फेर तपासणी केली. यात सुध्दा तिला गर्भधारणा झाली असल्याचे निदान झाले.

Minor Abortion Cases Kadam Doctors
बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाचा निकाल येत्या पाच फेब्रुवारीला

गावातीलच शेजारी राहत असलेल्या कपील गणेश राठोड (२० वर्ष) यांने एकांतात गाठुन तिचे सोबत जबरदस्तीने शारीक संबध प्रस्तापित केल्याची मुलीने तक्रार दाखल केली.

प्राप्त तक्रारीवरुन पोलीसांनी भादवीच्या कलम ३७६ (२एन), ४५१, ५०६ वा पास्को ४ व ६ अन्वये गुन्ह्यांची नोंद घेतली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळोंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जोस्ना गिरी पुढील तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com