अल्पवयीन मुले व्हाईटनरच्या नशेत; 'हव्याप्र' चाइल्ड लाइनच्या पुढाकाराने ३ बालकांना आधार

Minors intoxicated with whitener
Minors intoxicated with whitener

अमरावती : शहरात काही अल्पवयीन मुले व्हाईटनरच्या नशेत अडकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाइनने अशा तीन बालकांना हेरून त्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. या मुलांना विश्वासात घेत समुपदेशन करीत बालगृहाचा आधार दिला.

Minors intoxicated with whitener
New Parliament Building : विश्वासात न घेता नवी संसद उभारली; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

काही मुले व्हाईटनचे व्यसन करीत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोगाचे सदस्य अ‍ॅड. संजय सेंगर यांनी चाइल्ड लाईनला दिली. चाईल्डलाईनने शहर कोतवाली, जिल्हा बाल संरक्षण विभागाला सोबत घेत या मुलांना ताब्यात घेतले. कारवाईमध्ये मुलगा पळू नये दरम्यान त्याचा अपघात होऊ नये यावर विशेष भर देण्यात आला होता.

या मुलांशी संवाद साधला. पैशाच्या गरजेतून नशेचे व्यसन लागले असे, अल्पवयीन मुलांनी पदाधिकाऱ्यांपुढे सांगितले. मुलांची नोंद शहर पोलिसांत करून जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. बालकल्याण समिती यांच्या समक्ष उपस्थित करून तीन बालकांना निवारा देण्यात आला.

चाइल्ड लाइनचे संचालक डॉ. नितीन काळे तसेच बालकल्याण समितीचे सहकार्य लाभले. केंद्र समन्वयक शंकर वाघमारे, समुपदेशक सपना गजभिये, मीरा राजगुरे, पंकज शिनगारे, सरिता राऊत, अजय देशमुख, ऋषभ मुंदे, सर्वोदय जेवने, अभिजित ठाकरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सीमा भाकरे, भूषण कावरे आदींचे सहकार्य लाभले.

Minors intoxicated with whitener
New Parliament Building : विश्वासात न घेता नवी संसद उभारली; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

मुलांवर होणारा दुष्परिणाम

व्हाइटनर रुमालावर टाकून ओढल्याने त्याची नशा चढते. व्हाइटनरमध्ये अ‍ॅसिटोन असल्याने त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. अ‍ॅसिटोन हळूहळू स्नायूंवर परिणाम करून ते दुबळे करतात. मानसिकदृष्ट्या मुलांचे खच्चीकरण होऊन, आक्रमकताही तेजीने वाढते, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

समाजाने घ्यावा पुढाकार

चाइल्ड लाइन (१०९८) अनेक वर्षांपासून जिल्हास्तरावर महिला व बाल कल्याणाकरिता कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून बालगुन्हेगारी, बालविवाह, निराधार महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्या जातो. ही मुले सुद्धा समाजाचा घटक आहेत. त्यांना आधाराकरीता समाजाने पुढाकार घ्यावा. असे आवाहन चाइल्ड लाइनच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com