बेपत्ता युवतीचा आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

वरोरा (जि. चंद्रपूर) : पाच दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह शेतशिवारातील विहिरीत कुजलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना आज, बुधवारी उघडकीस आली.
तालुक्‍यातील भेंडाळा येथील मयुरी सोमेश्‍वर वैद्य (वय 22) ही वरोरा येथील महाविद्यालयात अर्ज दाखल करण्याचे कारण सांगून घरून बाहेर पडली. मात्र, त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबीय आणि पोलिसांनी शोध मोहीम राबविली. आज शेगाव-वाघोली रस्त्यालगतच्या एका शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेतकऱ्याने विहिरीत बघितले असता मृतदेह आढळून आला.

माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. कुटुंबीयांकडून ओळख पटवून घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रियकराने लग्नासाठी होकार दिला. काही महिने थांबण्यास सांगितले. मात्र, यानंतरही तिने आत्महत्या केली, अशी चर्चा नागरिकांत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing girl's dead body found