अचलपुरात आमदार बच्चू कडूंना धक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नागपूर- प्रहार संघटनेचे प्रणेते व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का बसला असून तेथे शिवसेनेने जोरदार धडक दिली आहे. त्यांच्या मतदारसंघातील चांदूरबाजार नगरपालिकेवर असलेले कडू यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

नागपूर- प्रहार संघटनेचे प्रणेते व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का बसला असून तेथे शिवसेनेने जोरदार धडक दिली आहे. त्यांच्या मतदारसंघातील चांदूरबाजार नगरपालिकेवर असलेले कडू यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये भाजपने आघाडी कायम राखली आहे. अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, मोर्शी, शेंदूरजनाघाट, दर्यापूर व धामणगाव रेल्वे नगरपरिषदांमध्ये भाजपने भगवा फडकाविला आहे. यात अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना मात्र अचलपूर व चांदूरबाजार या दोन्ही नगरपरिषदांवरील सत्तेवर पाणी सोडावे लागले. अचलपूरमध्ये शिवसेनेचे सुनील सिसके विजयी झाले तर चांदूर बाजारमध्ये भाजपचे रवि पवार विजयी झाले. या दोन्ही नगरपरिषदांवरील सत्ता गमवावी लागल्याने हा आमदार बच्चू कडू यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

दर्यापूरमध्ये भारसाकळे कायम
दर्यापूरमध्ये भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपला किल्ला कायम राखला. त्यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे निवडून आल्या. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे सुधाकर भारसाकळे होते. या जिल्ह्यातील निकालाने भाजपचे मूळ पुन्हा पक्के झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण अडसड यांनी आपले सुपुत्र प्रताप अडसड यांना निवडून आणण्यात यश आले. अरूण अडसड यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. हा पराभव त्यांच्यासाठी राजकारणाच्या परिघाबाहेर फेकण्यासाठी पुरेसा ठरला असता. या परीक्षेत अडसड यशस्वी ठरले. कॉंग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांच्यासाठी हा जबर धक्का आहे. परंतु त्याच मतदारसंघातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेवर कॉंग्रेसचे निलेश सूर्यवंशी निवडून आल्याने जगताप यांची काहीशी पत राखल्या गेली.

  • अचलपूर- सुनील सिसके (शिवसेना)
  • अंजनगावसुर्जी- कमलकांत लाडोळे (भाजप)
  • वरूड- स्वाती आंडे (भाजप)
  • चांदूरबाजार- रवि पवार (भाजप)
  • मोर्शी- शीला रोडे (भाजप)
  • शेंदूरजनाघाट- रुपेश मांडवे (भाजप)
  • दर्यापूर- नलिनी भारसाकळे (भाजप)
  • चांदूर रेल्वे- निलेश सूर्यवंशी (कॉंग्रेस)
  • धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड (भाजप)
Web Title: mla bacchu kadu losses nagar palika election