नक्षलवाद्यांचा खात्मा करा अन्यथा आंदोलन : बच्चू कडू

Bacchu Kadu
Bacchu Kadu

आर्णी (जि. यवतमाळ) : राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसांत नक्षलवाद्यांचा खात्मा करावा, अन्यथा आम्ही नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या स्थळापासून आंदोलन करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. 

शनिवारी (ता. चार) आमदार कडू यांनी तरोडा येथे भेट देऊन शहीद आग्रमन रहाटे यांना श्रद्घांजली अर्पण करून कुटुंबीयांसोबत संवाद साधला. नक्षलवादी क्षेत्रांत कितीच्या संख्येने गेलो पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजे, दोन वाहने सुरक्षित निघतात, ज्या वाहनात मोठ्या संख्येने जवान असतात. तेच वाहन कसे टार्गेट केले जाते. याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला. आतंकवादी हल्ल्यात संपूर्ण देश एकत्र येतो. मात्र, नक्षली हल्ल्याबाबत सरकार गंभीर दिसत नसल्याबद्दल आमदार कडू यांनी खंत व्यक्त केली.

नक्षलवाद्यांपेक्षा एका जिल्ह्यातील शिपायांची संख्या जास्त आहे. नक्षल्यांच्या हल्ल्यात गरीब घरातील मुलेच शहीद होत आहेत. ही बाब दुर्देवी आहे. सरकारने पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास आम्हीच गडचिरोली जिल्ह्यात जावून आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, राज्य संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हा प्रमुख विलास पवार, आर्णी तालुकाप्रमुख अंकूश राजूरकर, श्रीकांत काळे, गजू रोडगे आदींसह तरोडा ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com