वासनिकांच्या 'प्रतिमे'सोबत सानंदा यांचे फोटोसेशन चर्चेत!

mla dilipkumar sanandas photo session in discussion
mla dilipkumar sanandas photo session in discussion

खामगाव : एखादी व्यक्ती जिवंत असताना त्या व्यक्तीच्या वाढदिवशी प्रतिमा लावून फोटो काढण्याचा अजब प्रकार खामगाव शहरात पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षाचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं हे फोटोशन  टिकेत सापडले असून जिल्हाभर राजकिय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये जणू चढाओढ सुरू होती. वासनिक साहेबांवरील प्रेम भासविण्यासाठी त्यांच्या चाहत्यांचा मोठा आटापिटा सुरू होता. दरम्यान खामगाव येथे तर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी चक्क वासनिकांची भली मोठी प्रतिमा बनवून टाकली. विशेष म्हणजे ही प्रतिमा सार्वजनिक कार्यक्रमात जागोजागी मिरवून फोटोसेशन करण्यात आले. एखादी व्यक्ती जिवंत असतांना सार्वजनिक कार्यक्रमात त्या व्यक्तीची चक्क प्रतिमा लावणे हे अनेकांना खटकले. तर वासनिक आणि सानंदा यांचे सर्वश्रुत 'सख्य' यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
जिवंत व्यक्तीचा फोटो ठिकठिकाणी ठेवून त्यासोबतच उभे फोटो राहून फोटो काढण्यात आले. बरं झालं फुलं वाहण्याची दुर्बुद्धी आयोजकांना सुचली नाही. तर फोटो पाहून हा कार्यक्रम शुभेच्छा देण्यासाठी की श्रद्धांजली वाहण्यासाठी अशी चर्चा खामगाव शहरात दिवसभर सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com