आमदर भडकले, खंड नाही, तर समितीही नको

MLA Kinikar says, Terminate the Committee on Character Tools
MLA Kinikar says, Terminate the Committee on Character Tools

नागपूर : भाजपप्रणित सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125वे जयंती वर्ष देशविदेशात "समता वर्ष' म्हणून साजरे केले. परंतु, बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही खंड 2014 पासून 2019 या कालावधीत प्रकाशित केला नाही. जयंती वर्षात नुसता जल्लोष दिसत होता. खंड प्रकाशित झाला नाही. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती बरखास्त करण्यात यावी, असे मत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केले. विशेष असे की, ही समिती बरखास्त करण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारश करणार असल्याचे आमदार डॉ. किणीकर म्हणाले. 

बाबासाहेबांचे साहित्य परिवर्तनाचे तसेच प्रत्येक माणसाच्या प्रगतीसाठीचे साहित्य आहे. डॉ. आंबेडकर यांचे अप्रकाशीत साहित्य प्रकाशनाचा वसा स्वीकारत महाराष्ट्र सरकारने 1977 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती गठित केली. 2010 पर्यंत या समितीने 22 खंड प्रकाशित केले आहे. जर बाबासाहेबांच्या साहित्याचे खंड प्रकाशित झाले नसतील तर दर महिन्याला सदस्य सचिवांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम वसूल करावी.

खंड प्रकाशनच झाले नाही तर, मानधन घेण्याचा कोणताही अधिकार सदस्य सचिवांना नाही. यामुळे विद्यमान समितीचे सदस्य सचिवांना मानधन मिळाले असल्यास त्यांच्याकडून ते वसूल करावे, असे आमदार डॉ. किणीकर यांनी "सकाळ'शी संवाद साधताना म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष जल्लोषात सरकारने साजरे केले; मात्र बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित केले नाही, ही बाब गंभीर असून यामुळे समिती बरखास्त करण्याची सूचना करणार असल्याचे ते म्हणाले. 

खंड प्रकाशनासाठी लक्षवेधी लावणारे

भाजपप्रणित सरकारमधील तत्कालिन उच्च व तंत्रशित्रण मंत्री विनोद तावडे यांनी कॉंग्रेसच्या काळात विधान परिषदेत सभासद असताना बाबासाहेबांचे खंड प्रकाशनासाठी दरवर्षी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी लावत होते. परंतु, सत्तेवर आल्यानंतर तावडे या साहित्य प्रकाशन समितीचे अध्यक्ष बनल्यानंतरही त्यांना बाबासाहेबांच्या साहित्याचा विसर पडला. मागील पाच वर्षांत बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही खंड प्रकाशित केला नाही, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर मात्र आमदार डॉ. किणीकर यांनी ही बाब योग्य नसल्याचे सांगितले. 

साहित्यावर संशोधन करणारे अनेक विचारवंत 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर संशोधन करणारे अनेक विचारवंत आहेत. बाबासाहेबांनी मजूर मंत्री, कायदेमंत्री म्हणून काम केले आहे. वीज, पाणी, नदी जोड यासह देशातील प्रमुख समस्यांवर बाबासाहेबांच्या साहित्यात "उत्तर' सापडते. यामुळे बाबासाहेबांचे साहित्य संशोधन करणाऱ्या साहित्यिकांना सदस्य सचिव म्हणून संधी द्यावी. त्यापूर्वी विद्यमान समिती बरखास्त करावी. 
- डॉ. बालाजी किणीकर, 
आमदार, अंबरनाथ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com