आमदार पुराम म्हणाले, "ती' व्हिडिओ क्‍लिप माझी नव्हेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

देवरी (जि. गोंदिया) : आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना व माझ्या लोकप्रियतेला घाबरून विरोधी पक्षाच्या नागरिकांनी मला बदनाम करण्यासाठी बनावट व्हिडिओ क्‍लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून माझ्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप आमदार संजय पुराम यांनी भाजपच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. 27) आयोजित पत्रकार परिषदेत केला.

पुराम म्हणाले, मी पाच वर्षांत देवरी-आमगाव या विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे केली. या कामांना बघून विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांनी माझी बनावट व्हिडिओ क्‍लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. हे एक षड्‌यंत्र आहे. मी व माझा पक्ष त्याचा निषेध करतो. या क्‍लिपसंदर्भात गुरुवारी (ता. 26) देवरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिस कारवाई करणार आहेत, असेही पुराम म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, महामंत्री प्रवीण दहीकर, अनिल येरणे, विनोद भेंडारकर, नगराध्यक्ष कौशलबाई कुंभरे, गटनेते संतोष तिवारी, राजेश चांदेवार, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष महेशकुमार जैन आदी उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात देवरी ठाणेदारांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA puram denied news of viral video