आमदार रवी राणांची दिवाळी तुरुंगात; सोळा कार्यकर्त्यांनाही सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रशिक मकेश्वर
Saturday, 14 November 2020

पोलिसांनी आंदोलन स्थळावरून आमदारासह १६ कार्यकर्त्यांना अटक करीत गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री उशिरा आमदार रवी राणासह शेतकऱ्यांवर तिवसा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तिवसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तिवसा (जि. अमरावी) : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत व वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी आमदार रवी राणा यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले होते. यामुळे त्यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने काल रात्री उशिरा आमदार रवी राणा यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अतिरिक्त वीज बिलमुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे. यातच अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन व कपाशीवर बोंडआळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार मदत व वीज बिल माफी करावी यासाठी आमदार रवी यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन अमरावतीच्या गुरूकुंज मोझरी येथे रास्तारोको आंदोलन केले.

सविस्तर वाचा - नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई

पोलिसांनी आंदोलन स्थळावरून आमदारासह १६ कार्यकर्त्यांना अटक करीत गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री उशिरा आमदार रवी राणासह शेतकऱ्यांवर तिवसा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तिवसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भेटण्यासाठी गेले असता पोलिसांनी रोखले

काल मध्यरात्री रवी राणा व शेतकऱ्यांना अमरावती कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवले होते. शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व कार्यकर्ते भेटण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे खासदार व कार्यकर्ते यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करीत प्रशासन व सरकारच निषेध केला.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

राणासह कार्यकर्ते विलगीकरण कक्षात

कोरोनाचा काळ असल्यानें मध्यवर्ती कारागृहाच्या विलगीकरण कक्षात रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ravi Rana Diwali in jail