esakal | आमदार रोहीत पवार म्हणतात, शिवशंकरभाऊ हे मॅनेजमेंट गुरू
sakal

बोलून बातमी शोधा

shhivbhau.jpg

आमदार रोहित पवार सोमवारी अमरावती जिल्ह्यात होते. अमरावतीवरून परत येताना अकोला व नंतर शेगाव येथे त्यांनी श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

आमदार रोहीत पवार म्हणतात, शिवशंकरभाऊ हे मॅनेजमेंट गुरू

sakal_logo
By
श्रीधर ढगे

शेगाव (जि. बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सायंकाळी (ता.27) श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवशंकर भाऊ पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. शेगाव संस्थानची विविध सेवा कार्य, स्वच्छता आणि सेवाभाव पाहून भारावून गेलो आहे, ही सर्व किमया करणारे शिवशंकर हे माणसामधला देवमाणूस आणि  मॅनेजमेंट गुरू आहेत, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


हे वाचा - अकोल्याच्या या खेळाडुने केली व्दिशतकी खेळी
‘संस्थान’ची शिस्तबद्धता पाहून भारावले

आमदार रोहित पवार सोमवारी अमरावती जिल्ह्यात होते. अमरावतीवरून परत येताना अकोला व नंतर शेगाव येथे त्यांनी श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसर, भक्त निवास हा परिसर फिरुन पाहिला. संस्थानचा भव्यपणा, कमालीची स्वच्छता-टापटीप आणि निष्ठेने काम करणारे शेकडो सेवेकरी पाहून मी भारावून गेलो असे आमदार पवार म्हणाले.


क्लिक करा - मालमत्तांचे पुनर्मुल्यांकनही 2002 च्या दराने
भाऊंबद्दल खूप ऐकलं; आज भेट

संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे प्रयत्न आणि लोकांचे सकारात्मक विचार यांचा हा एकत्रित परिणाम आहे. भाऊंच्या कामाविषयी पवार साहेब आणि अन्य काही लोकांकडून मी ऐकलं होतं. आज भाऊंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. 80 व्या वर्षीही उत्तम तब्येत, दांडगी स्मरणशक्ती आणि संस्थानच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची त्यांची निस्वार्थी वृत्ती मनाला खूपच भावली असेही रोहीत पवार म्हणाले.


भाऊंना भेटून वाटले समाधान!
आज गजानन महाराज संस्थानला एक प्रमुख संस्थान बनवणं, त्यांचं अभियांत्रिकी कॉलेज, 650 एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर साकारलेला आनंदसागर सारखा पृथ्वीवरील स्वर्ग उभा करण्यामध्ये भाऊंचं योगदान खूप मोठं आहे.  निःस्वार्थी भावनेने अविरत आणि प्रामाणिकपणे काम करण्याची भाऊंची बरोबरी कुणीही करणार नाही. त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि समाधानही वाटले.

loading image
go to top