esakal | अमरावतीत काय म्हणाले, आमदार रोहित पवार...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : दीपप्रज्वलन करताना आमदार रोहित पवार व अन्य मान्यवर.

शेतीक्षेत्राचा विकास झाला; तरच इतर उद्योगांचा विकास होणार आहे. त्यामुळे शेतीशिवाय इतर क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजक व व्यावसायिकांनी शेतीच्या विकासाला अग्रक्रम दिला पाहिजे, असा सल्ला बारामती ऍग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आमदार रोहित पवार यांनी उद्योजकांना दिला.

अमरावतीत काय म्हणाले, आमदार रोहित पवार...वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : क्रेडाई अमरावतीच्या वूमेन्स व युथविंगने आयोजित केलेल्या "वर्ष 2020 भविष्यातील उद्योगासमोरील आव्हाने' या विषयावरील परिसंवादात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते.

परिसंवादास बांधकाम क्षेत्राव्यतिरिक्त चेंबर ऑफ कॉमर्स, औषध, आरोग्य, कृषी, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल, हॉटेल्स व बार, पर्यटन, वैद्यकीय तसेच इतर क्षेत्रांतील उद्योजकांसह व्यावसायिक उपस्थित होते.

अमरावती व्यवसायासाठी अतिउत्तम

आमदार रोहित पवार म्हणाले, उद्योग सुरू करताना अनेक अडचणी येतात म्हणून थांबणे योग्य नाही. त्यातून मार्ग शोधले पाहिजे. आपण जे व्यवसाय व उद्योग निवडतो ती सर्व शेती क्षेत्राशी संबंधित असतात. अमरावती व्यवसायासाठी अतिउत्तम भाग आहे. शेती समृद्ध असल्यास इतर उद्योग फोफावतात. आपल्या भागात मोठे व्यवसाय किंवा उद्योग यावा, असे सर्वांनाच वाटते, मात्र मूलभूत सोयींचा अभाव हे मोठे आव्हान आहे.

शेतीक्षेत्राचा विकास व्हावा

शेतीक्षेत्राचा विकास झाल्यास बाजारपेठेतील उलाढाल वाढते. त्यामुळे आपला उद्योग शेतीचा नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडेसे पैसे वाचविण्यासाठी करचोरी करू नका. तुमचे सर्व व्यवहार लिंकिंग झाले आहेत. त्यामुळे तुमची बचत, मिळकत व उत्पन्नासह क्रयशक्ती तत्काळ स्पष्ट होते, असेही रोहित पवार म्हणाले.

प्रास्ताविक क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष पंकज देशमुख यांनी केले. परिचय शैलेश वानखडे यांनी करून दिला. या वेळी क्रेडाईचे राम महाजान, कपील हांडे, सचिन वानखडे, संजय जाधव, जिजाऊ बॅंकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, ऑटोमोबाईल क्षेत्रातून रणजित बंड आदी उपस्थित होते.

अवश्‍य वाचा : विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न : रोहित पवार

आगामी अर्थसंकल्प समाधानकारक नसणार

रोजगार देणारे तुम्ही आहात, असा उपस्थितांचा उल्लेख करून आमदार रोहित पवार म्हणाले, नोटाबंदी व जीएसटीचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. असंघटित क्षेत्राला याचा फटका अधिक बसला आहे. घसरलेला जीडीपी उंचावण्याची शक्‍यता फार कमी आहे. आगामी अर्थसंकल्पापासून फार अपेक्षा करता येणार नाही.