केदारांना कोण धमकावतोय? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नागपूर - आपल्याला काही लोक भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मी काय चिज आहे हे जिल्ह्याला ठावूक आहे. गिधाड धमक्‍यांना घाबरत नाही, असे जाहीर भाषणात सांगून आमदार सुनील केदार यांनी ठणकावले. यामुळे केदारांना कोण धमकावतोय आणि त्यांनी कोणाला इशारा दिला, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. 

नागपूर - आपल्याला काही लोक भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मी काय चिज आहे हे जिल्ह्याला ठावूक आहे. गिधाड धमक्‍यांना घाबरत नाही, असे जाहीर भाषणात सांगून आमदार सुनील केदार यांनी ठणकावले. यामुळे केदारांना कोण धमकावतोय आणि त्यांनी कोणाला इशारा दिला, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसह विरोधकांची संघर्ष यात्रा गुरुवारी नागपुरात दाखल झाली. व्हेरायटी चौकात नेत्यांची भाषणे झाली. या वेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते. संघर्ष यात्रेचे समन्वयक सुनील केदारांनी माईक ताब्यात घेतला आणि सडेतोड टोलेबाजी केली. मी एखादी गोष्ट मनावर घेतली तर तडीस नेतो. काही लोक आपल्याला भीती दाखविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण कोणाला घाबरत नाही, असेही केदार म्हणाले. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. केदार यांना कोण धमकावतो आणि त्यांनी कोणाला इशारा दिला अशी चर्चा संघर्ष यात्रा संपल्यानंतर व्हेरायटी चौकात रंगली होती. 

महापालिकेच्या निवडणुकीत केदार आणि मुत्तेमवार गटांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. केदार यांनी शहरात काही उमेदवारांसाठी चांगलाच दबाव निर्माण केला होता. काही जणांना तिकीटही मिळाली. दीपक चौधरी यांना कॉंग्रेसची तिकीट दिले. त्यांच्या आईंना मात्र मिळाले नाही. त्याऐवजी मुत्तेमवार गटाचे दीपक वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. यानंतर मीना चौधरी यांनी बंडखोरी केली. त्यांचा उघडपणे प्रचार केदारांनी केला. यावरून दीपक वानखेडे व त्यांच्यात चांगलेच वाजलेसुद्धा होते. नेत्यांच्या भांडणात दीपक वानखेडे यांचा पराभव झाला. संघर्ष यात्रेत वानखेडे यांनी केदार यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. याच कारणाने केदारांनी त्यांनी मुत्तेमवार गटाला इशारा दिल्याचे बोलल्या जाते. विशेष नागपूरच्या सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच शहराध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित नव्हते. 

Web Title: MLA sunil kedar