महागड्या खाद्यपदार्थांविरोधात मनसे सरसावली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नागपूर - शहरातील मल्टिप्लेक्‍स संचालकांकडून खाद्यपदार्थ्यांच्या नावावर लूट सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआरमध्ये धडक दिली. जनतेची लूट न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी पीव्हीआर व्यवस्थापकास दिला.

मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपटासाठी अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारल्यानंतरही दहा रुपयांचे पॉपकॉर्न दीडशे रुपयांत विकले जात आहे. नागरिकांच्या या लुटीकडे लक्ष वेधत ‘सकाळ’ने २९ मे रोजी ‘जेवणाच्या थाळीपेक्षा पॉपकॉर्न महाग’ या मथळ्यासह वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत मनसेचे प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनात मनसे पदाधिकारी गांधीसागरजवळील एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआर मल्टिप्लेक्‍समध्ये धडकले. मनसे पदाधिकारी येणार असल्याची कुणकूण लागताच येथे मोठा पोलिस बंदोबस्त केला होता. मात्र, पीव्हीआरच्या व्यवस्थापकाचा मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला.

मल्टिप्लेक्‍समध्ये खाद्यपदार्थांच्या किमती आटोक्‍यात ठेवाव्या, या आशयाचे निवेदन मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले. हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात तसेच मनसे उपशहराध्यक्ष विशाल बडगे, विभागअध्यक्ष प्रशांत निकम, शहरसचिव घनश्‍याम निखाडे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात उमेश उत्तखेडे, पिंटू भिसेन, शशांक गिरडे, इक्‍बाल रिझवी, आशीष पांढरे, गौरव पुरी, सूरज भिलकर, अरुण तिवारी, सुभाष धबाले, मयूर मेश्राम, विजय मंडलेकर, विनेश गेगरी आदी सहभागी झाले होते.

Web Title: MNS Agitation PVR Multiplex Popcorn rate