मनसेच्या बांधणीसाठीच दौरा

यवतमाळ - कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व उपस्थित पदाधिकारी.
यवतमाळ - कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व उपस्थित पदाधिकारी.

यवतमाळ - निवडणुकीसाठी एक वर्ष आहे. या काळात पक्षसंघटन मजबूत करून सक्षम पर्याय तयार करणार आहे. त्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आहे. वर्षाअखेरीस पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे. त्या वेळी नवीन काही तरी देणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

येथील वसंतराव नाईक श्रोतृगृहात आज सोमवारी (ता. २२) सायंकाळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, हा दौरा जाहीर सभा किंवा कार्यकर्ता मेळावा घेण्यासाठी नाही. तशा सूचना मी केल्या होत्या. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आल्याची माहिती मला मिळाल्याने मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. यानंतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संघटनबांधणीसाठी चर्चा करणार आहे.

पक्षवाढीसाठी काही बदल आवश्‍यक आहेत. निवडणुकीपूर्वी रचनात्मक बांधणी करून निवडणुकीत सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

कार्यकर्त्यांचा हिरमोड
राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी दुपारी चारपासूनच श्रोतृगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. केवळ दोन मिनिटे राज ठाकरे यांनी संवाद साधत, डिसेंबर व जानेवारीत येण्याचे जाहीर केले. त्यामुळे दूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com