मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणारे ‘जॉय ऑफ लर्निंग’

Mobile
Mobile

नागपूर - मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी नेमके काय करावे, हा प्रश्‍न सर्वच पालकांना छळत आहे. यावर चर्चा होते; पण उपाय कुणीच सांगत नाही. मात्र, तारका पाटील यांनी ‘जॉय ऑफ लर्निंग’द्वारा या समस्येवर आनंददायी शिक्षणाचा तोडगा काढला आहे.

मूळच्या अलीबागच्या तारका पाटील यांनी बारावीनंतर अहमदाबाद येथे ‘फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन’मध्ये साडेचार वर्षांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नीलय बडवणे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या नागपूरला आल्या. नीलय यांना स्पेनमध्ये नोकरी लागल्याने दोघेही स्पेनमधे स्थायिक झाले. येथेही अभ्यासू वृत्ती तारका यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच स्पेनमधील वृत्तपत्रात शिष्यवृत्ती परीक्षेची जाहिरात आली. तारका यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला. त्यात त्यांची निवड झाल्याने एक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीचा फायदा घेत तारका यांनी बार्सिलोना, स्पेन येथे ‘मास्टर इन डिझाइन मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. येथे शिक्षण घेत असताना मोबाईलसाठी मुलांनी आत्महत्या केल्याच्या काही बातम्या त्यांच्या वाचनात आल्यात. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी काहीतरी करावे, या उद्देशाने त्यांनी ‘जॉय ऑफ लर्निंग’ हा प्रोजेक्‍ट सादर केला. यात ‘ॲलेक्‍सा’सारखे एक ‘स्पीकर डिव्हाइस’ असून ते मुलांशी संवाद साधू शकते. म्हणजेच मुलांनी पुस्तकातील चार ओळी वाचल्या तर हे उपकरण वाचनातील चुका, स्पेलिंगच्या चुका सांगते. तीन ते सात वर्षांच्या मुलांना विचारात घेऊन तारका यांनी हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून मुलांच्या मनात घरात संवाद साधायला कुणीतरी आहे, अशी भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच अभ्यासाची गोडी निर्माण होऊन त्यांचे शिक्षण आनंददायी होते, असा त्यांचा दावा आहे. या माध्यमातून मुलांना मोबाईल वापरापासूनही दूर ठेवता येऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

लहान मुले मोबाईलवर असतात. मोबाईलसाठी रडणे, चिडचिड यामुळे पालकही कंटाळून मुलांना मोबाईल वापरू देतात. मात्र, मोबाईल वापराचे दुष्परिणाम मोठे आहेत. जॉय ऑफ लर्निंगमुळे मुलांना मोबाईलच्या पडद्यापासून दूर ठेवता येते.
- तारका पाटील बडवणे, संशोधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com