मोबाईल चोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : मोबाईल चोरांची आंतरराज्यीय टोळी नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागली आहे. रविवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकावरून टोळीच्या चार सदस्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून चोरीचे 17 महागडे मोबाईल हस्तगत केले आहे. 
विक्की मोगिया (20, रा. धरमुंडरा, विदिशा, मध्यप्रदेश), अमन चव्हाण (30), करण मोगिया (19) व डकोराम सोळंकी (20) तिन्ही रा. गुलगाव, सांची उत्तर प्रदेश अशी चोरट्यांची नावे आहेत. ते मोठ्या शहरांमध्ये रेल्वेस्थानक व अन्य गर्दीच्या ठिकाणी फिरून चोऱ्या करीत होते. प्रामुख्याने मोबाईल चोरीवर त्यांचा भर असायचा. 

रमेश नागपुरे (36, रा. कारंजा, गोंदिया) हे सेल्समन आहे. गावी परतण्यासाठी रविवारी सायंकाळी ते नागपूर रेल्वेस्थानकावर आले. फलाट क्र. एकवर थांबलेल्या गितांजली एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यात चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी तातडीने लोहमार्ग ठाणे गाठून तक्रार दिली. सूचना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शेख व सहकाऱ्यांनी रेल्वेस्थानकावर धडक देत संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला. फलाट क्र. चारवर इटारसी एंडच्या दिशेने चारही आरोपी संशयास्पद अवस्थेत वावरताना दिसले. संशयाच्या आधारे पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ठाण्यात आणून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचे 17 मोबाईल आढळले. पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत चारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून आखणी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप गोंडाणे अधिक तपास करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile theft gang arrested