धावत्या रेल्वेत मोबाईलचोर जेरबंद 

file photo
file photo

नागपूर  : धावत्या रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने प्रवासादरम्यानच अटक केली. त्याच्याकडून चोरीचे सहा मोबाईल जप्त केले. शनिवारी गीतांजली एक्‍स्प्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. 
दीपक साहू (22) रा. लोधीपुरा, रायपूर, छत्तीसगड असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास करायचा आणि संधी मिळताच प्रवाशांचे मोबाईल लांबवायचे अशी त्याची पद्धती आहे. 12870 गीतांजली एक्‍स्प्रेसच्या एस-5 क्रमांकाच्या डब्यातून अजिंक्‍य टेंभुर्णे (25) रा. इंदोरा हा हावडा ते नागपूर असा प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान गाडीने भंडारा स्थानक सोडताच त्याचा मोबाईल चोरीला गेला. त्यावेळी दपूमरे रेल्वे सुरक्षा दलाच्या मोतीबाग ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक विनोद साहू, व्ही. के. दुबे तसेच भंडारा ठाण्याचे कृष्णा सावरकर गाडीत गस्त घालत होते. अजिंक्‍यने त्यांना मोबाईल चोरीची माहिती दिली. जवानांनी लागलीच चोरट्याचा शोध सुरू केला. दीपककडे लक्ष जाताच त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आले. चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्याच्याकडील बॅगची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल सहा मोबाईल आणि एका कागदात गुंडाळलेले 14 सीमकार्ड आढळले. खाक्‍या दाखविताच त्याने चोरीचीही कबुली दिली. सोबतच अजिंक्‍यने त्याचा मोबाईलही ओळखला. चोरट्याकडून मोबाईल, सीमकार्डसह 27 हजार 455 रुपये रोख असा एकूण 1 लाख 47 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील कारवाईसाठी त्याला मुद्देमालासह इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com