पशूपालकांनो! आता गुरांच्या चिकित्सेसाठी थेट दारात मोबाईल व्हॅन, गैरसोय टळणार

mobile van active for cattle check up in amravati
mobile van active for cattle check up in amravati
Updated on

अमरावती : ग्रामीण भागातील गाय, म्हैस, बकरी अशा विविध पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहावे व त्यांना वेगवेगळ्या आजारांवर उपचार तातडीने व्हावेत, यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री पशू स्वास्थ्य योजनेद्वारे पशुचिकित्सा पथक वाहनांची सोय करण्यात आली आहे. या माध्यमातून पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचून पशू आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. पुढील सप्ताहात ही सेवा कार्यरत होणार असल्याचे अमरावती विभाग प्रादेशिक सहआयुक्त डॉ. राजीव भोजने यांनी सांगितले.

जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात अचलपूर, अंजनगावसुर्जी, अमरावती व तिवसा या चार तालुक्‍यांत पशुचिकित्सा पथक वाहन कार्यरत करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्‍यासाठी एक वाहन ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील पशुधनवाढीबरोबर त्यांच्या विकासासाठी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात, त्यापैकीच ही एक योजना आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांना पाळीव जनावरांना उपचारासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणताना अनेक अडथळे येतात. अशावेळी अनेकवेळा पशू दगावण्याची शक्‍यता असते. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री पशू स्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तालुकास्तरावर फिरते पशुचिकित्सा पथके स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगावसुर्जी, अमरावती व तिवसा या तालुक्‍यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षात फिरते पशू चिकित्सालय पथक वाहने उपलब्ध झाली आहेत. 20 व्या पशूगणनेनुसार जिल्ह्यात समुारे 10 लाख 3 हजार पशुधन आहे. त्यामध्ये 5 लाख 31 हजार गायी, 1 लाख 19 हजार म्हशी ,72 हजार मेंढरे, 2 लाख 81 हजार शेळ्या आहेत.

काय असेल सुविधा -
फिरते पशुचिकित्सालय पथक वाहनामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक चालक व मदतनीस राहणार आहे. या पथकाकडून पशूंची तपासणी केली जाणार आहे. वेगवेगळ्या तपासणी करून आजारावरील निदान तातडीने होणार आहे तसेच औषधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात चार तालुक्‍यांतील गावे व वाड्यावस्त्यांमधील पशूंची तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com