प्रचाराच्या दंगलीत मोदींचाच "ब्रॅंड'! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने वापरलेला "मोदी ब्रॅंड' यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही कायम असेल. महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही प्रचाराच्या ब्रॅंडिंगमध्ये समावेश राहणार आहे. 

निवडणुकीत विविध पक्षांचा प्रचाराचा अजेंडा काय असेल, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असेल. अद्याप प्रस्थापित वगळता इतर उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब न झाल्याने जाहीर प्रचार सुरू झालेला नाही. मात्र, इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने कल जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष पाच वर्षांत केलेल्या कामगिरीपेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या अडीच वर्षांतील कामांवर अधिक फोकस करणार आहे, असे कळते. 

सिमेंट रस्त्यांचा अपवाद वगळता मेट्रो, मिहान आणि "मेक इन इंडिया' यासारखे प्रकल्प व उपक्रम सत्ताधारी पक्ष प्रचाराच्या अजेंड्यात सामील करण्याची दाट शक्‍यता आहे. अर्थात त्यादृष्टीने सुरुवातही झालेली आहे. त्यातही शहरातील सिमेंट रस्ते हा केंद्रीय नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील प्रकल्प आहे. त्यामुळे हा महानगरपालिकेचा प्रकल्प असला तरी त्यातही गडकरींच्या नावाचे ब्रॅंडिंग असेल, यात शंका नाही. 

"दुश्‍मन की देखो जो वाट लावली' 
प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये यंदा "दंगल' चित्रपटाचे शीर्षक गीत आघाडीवर असणार आहे. मात्र, नगर परिषदेच्या निवडणुकांचा अनुभव बघता "बाजीराव मस्तानी' चित्रपटातील गाजलेले "मल्हारी' हे गीत अधिक प्रमाणात वापरले जाईल, असा अंदाज आहे. या गाण्यातील "दुश्‍मन की देखो जो वाट लावली' ही ओळ एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना विविध पक्षांसाठी "फेव्हरिट' ठरणार आहे, असे साउंड्‌ज बेस्ट स्टुडिओचे संचालक नहुश बडगे म्हणतात. 

Web Title: Modi brand in election