सरसंघचालक मोहन भागवात यांना डी.लिट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

नागपूर - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त समारंभ गुरुवारी (ता. 9) सकाळी 10 वाजता सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केला आहे. यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डी.लिट प्रदान करण्यात येणार आहे.

नागपूर - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त समारंभ गुरुवारी (ता. 9) सकाळी 10 वाजता सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केला आहे. यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डी.लिट प्रदान करण्यात येणार आहे.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकासमंत्री व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती व्यवसायमंत्री महादेव जानकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सचिव व महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहापात्रा उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान व मत्स्य विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांत मुलींच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. पशुवैद्यकीय क्षेत्राकडे मुलींचा वाढता कल ही दिलासादायक बाब आहे. या तिन्ही शाखांत पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये मुलींची टक्केवारी 35 टक्‍के आहे.

यावेळी 2014 -15 व 2015-16 या दोन्ही वर्षांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाईल. यात एकूण 815 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्या जाईल. यापैकी 648 विद्यार्थी पशुवैद्यकीय शाखेतील 103 दुग्ध तंत्रज्ञान, 64 विद्यार्थी मत्स्य विज्ञान शाखेतील आहेत. तिन्ही विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना 48 सुवर्ण व 16 रजतपदक दिले जाणार असल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

सरसंघचालकांचे गोवसंवर्धन क्षेत्रात कार्य
डॉ. मोहन भागवत हे सरसंघचालक असल्यानेच मानद पदवी दिल्या जात आहे का? या प्रश्‍नावर कुलगुरू यांनी त्यांचे गोसंवर्धन क्षेत्रात मोठे कार्य असल्याचे सांगितले. विद्यापीठाची शिक्षण परिषद आणि राज्यपालांच्या मंजुरीनंतरच हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Web Title: mohan bhagwat d.lit post