कोकोटी जंगलात पोलिसांची माओवाद्यांसोबत चकमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

गडचिरोली : एटापल्ली तालुक्‍यातील कोटमी पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या कोकोटी जंगलात आज, बुधवारी दुपारी पोलिसांची माओवाद्यांसोबत चकमक उडाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सध्या माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. त्यामुळे कोटमी पोलिस मदत केंद्रातील पोलिस शोधमोहीम राबवीत होते. आज दुपारी दोनच्या सुमारास कोकोटी गावानजीकच्या जंगलात दबा धरून बसलेल्या सशस्त्र माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच माओवादी जंगलात पसार झाले. चकमकीत कोणतीही हानी झाली नाही. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षल पत्रके, पिट्टू, वॉकिटॉकी व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.

Web Title: moist news

टॅग्स