उपचारासाठी आली अन् अत्याचाराची शिकार बनली...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुलगाव (जि. वर्धा) : येथील ग्रामीण रुग्णालयात मैत्रिणीसोबत उपचाराकरिता आलेल्या अल्पवयीन मुलीवर त्याच रुग्णालयातील एका अल्पवयीन मुलाने बळजबरी केली. ही घटना 17 डिसेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाइनच्या हस्तक्षेपानंतर रविवारी (ता. 23) गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

गुंजखेडा येथील अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत आली होती. डॉक्‍टरांनी तिला दाखल करून घेतले. यावेळी पीडिता तिच्यासोबत थांबली. दरम्यान, तिची ओळख याच रुग्णालयात असलेल्या एका युवकासोबत झाली. या युवकाने ओळखीचा लाभ घेत तिच्यावर बळजबरी केली. यानंतर दुसऱ्या दिवशी सदर युवक गुंजखेडा येथे गेला असता त्याला सदर मुलगी दिसली. येथेही त्याने तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत बळजबरी केली.

झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या आईने चाइल्ड हेल्पलाइनला दिली. मात्र, पीडित मुलगी काहीच सांगत नव्हती. अखेर शुक्रवारी सकाळी तिने घटनेची माहिती दिल्यानंतर पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सय्यद, शिपाई सागर गिरी करीत आहेत.

Web Title: Molestation on minor girls in rural hospital at wardha