esakal | सोमवारचा दिवस सर्वात लहान तर रात्र मोठी; अनुभवता सुद्धा येणार गुरू-शनीची महायुती
sakal

बोलून बातमी शोधा

Saturn-And-Jupiter

सध्या पश्‍चिम आकाशात गुरूच्यावर शनी दिसतो. परंतु, गुरू ग्रह शनीकडे सरकत असल्यामुळे सोमवारी, २१ डिसेंबरला तो शनीच्याजवळ राहील व पुढे सरकत राहील. त्यामुळे २१ तारखेनंतर शनी ग्रह गुरू ग्रहाच्या खाली दिसू लागेल.

सोमवारचा दिवस सर्वात लहान तर रात्र मोठी; अनुभवता सुद्धा येणार गुरू-शनीची महायुती

sakal_logo
By
प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : २१ डिसेंबर या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस तर सर्वात मोठी रात्र असते. तसेच सोमवारी (ता. २१) रात्री आकाशात शनी आणि गुरू या दोन महाकाय ग्रहांची महायुती होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी या खगोलीय घटनांची अनुभूती घेता येणार आहे. 

या दोन ग्रहांच्या कक्षामध्ये ६५ कोटी किलोमीटरचे अंतर आहे. परंतु त्यांची कक्षेत फिरण्याची विशिष्ट गती व आपल्या दृष्टीने त्यांचा बदललेला कोन यामुळे हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यासारखे भासणार आहेत. यालाच ग्रहांची महायुती असे म्हणतात. वास्तविक शनी आणि गुरूची युती ही दर २० वर्षांनी होते. परंतु हे दोन ग्रह इतक्‍या जवळ येण्याची घटना ८०० वर्षांनंतर यावर्षी पहावयास मिळणार आहे. या वेळी या दोन ग्रहांमध्ये केवळ ०.१ अंशाचे अंतर असेल. म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासाच्या फक्त एक पंचमांश इतके अंतर असेल. 

जाणून घ्या - २५ वर्षीय युवकाने उभारला देशातील पहिला ‘स्काय वॉक’; पंतप्रधान कार्यालयाने केले पंकजचे कौतुक 
 

सध्या पश्‍चिम आकाशात गुरूच्यावर शनी दिसतो. परंतु, गुरू ग्रह शनीकडे सरकत असल्यामुळे सोमवारी, २१ डिसेंबरला तो शनीच्याजवळ राहील व पुढे सरकत राहील. त्यामुळे २१ तारखेनंतर शनी ग्रह गुरू ग्रहाच्या खाली दिसू लागेल. त्यानंतर त्यांच्यातील अंतर वाढू लागेल. यापूर्वी अशी महायुती ११२६ साली पहावयास मिळाली होती. तसे पाहता १६२३ सालीसुद्धा ही घटना घडली होती.

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

साठ वर्षानंतर दिसेल अशी युती

२० वर्षाच्या अंतराने होणारी युती यापूर्वी २८ मे २००० मध्ये झाली होती. यापुढे ती ३१ ऑक्‍टोबर २०४०, ७ एप्रिल २०६०, १५ मार्च २०८० आणि १८ सप्टेंबर २१०० रोजी होईल. पैकी १५ मार्च २०८० मध्ये या दोन ग्रहांतील अंतर आजच्या इतके कमी राहील. म्हणजेच हे दोन ग्रह इतके जवळ पाहण्यासाठी पुढील ६० वर्षे वाट पहावी लागणार आहे.
 

शनी- गुरू महायुती अतिशय बलवत्तर आणि शुभ आहे. उत्तराषाढा या रवीच्या नक्षत्रात कुंभ नवमांशात ही महायुती होत आहे. भारताच्या दृष्टीने ही महायुती अनुकूल असून आर्थिक व सामाजिक दृष्ट्‌या महत्त्वाची आहे. या महायुतीच्या परिणामी अर्थकारणाला गती येऊ शकेल आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही ही महायुती अनुकूल ठरू शकेल. 
- शांताराम हिवरकर, 
पंचांग अभ्यासक, हिंगणघाट, जि. वर्धा.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image