खासगी डॉक्टरांनी कारोनाला केले ‘कॅश’; कित्येकांचा बेडअभावी मृत्यू

खासगी डॉक्टरांनी कारोनाला केले ‘कॅश’; कित्येकांचा बेडअभावी मृत्यू

यवतमाळ : कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेत रुग्णांचे बेड, ऑक्सिजन व इंजेक्शनअभावी हाल झालेत. शासकीय सोडाच खासगी कोविड रुग्णालयांतदेखील गंभीर रुग्णांना बेड मिळाले नाहीत. एक बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना कित्येक रुग्णालये पालथी घालावी लागलीत. उपचाराअभावी कित्येकांना जीव गमवावा लागला. या काळात खासगी डॉक्टरांनी (Private doctor) कारोनाला चांगलेच कॅश केले. आता दुसरी लाट कमी होताच रुग्णालयांतील गर्दी ओसरली आहे. उशिरा लाखोंची गुंतवणूक करून कोविड हॉस्पिटल सुरू करणारे डॉक्टर आर्थिक अडचणीत आले आहेत. (Money-earned-by-private-doctors-during-the-Corona-period)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत भीतीअभावी अनेकांनी काही दिवस खासगी रुग्णालये बंद ठेवलीत. रुग्णांवर उपचारासाठी निर्बंधही लादण्यात आले होते. मात्र, रुग्णसंख्या वाढताच खासगी कोविड रुग्णालयांना मान्यता देण्यात आली. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या इतकी वाढली की, रुग्णांना बेडही मिळेनासे झालेत. त्याचा फायदा काही डॉक्टरांनी घेतला. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायावर प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात आले. मात्र, काही डॉक्टरांच्या सामाजिक जाणीवेमुळे वैद्यकीय व्यवसायावरील मळभ दूर झाले.

खासगी डॉक्टरांनी कारोनाला केले ‘कॅश’; कित्येकांचा बेडअभावी मृत्यू
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

जिल्ह्यात दोन हजार १६८ बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ११ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व ३४ खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण बेडची संख्या दोन हजार २७९ आहे. त्यापैकी १११ बेड रुग्णांसाठी उपयोगात असून, दोन हजार १६८ बेड उपलब्ध आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५७७ बेडपैकी ४६ बेड रुग्णांसाठी उपयोगात असून, ५३१ बेड शिल्लक आहेत.

११ डीसीएचसीमध्ये एकूण ५२६ बेडपैकी ४५ रुग्णांसाठी उपयोगात तर ४८१ बेड शिल्लक आहेत. ३४ खासगी कोविड रुग्णालयात एकूण एक हजार १७६ बेडपैकी २० उपयोगात तर एक हजार १५६ बेड शिल्लक आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता दुसऱ्या लाटेत उशिरा खासगी डॉक्टरांनी रुग्णालयात गुंतवणूक करून उलाढाल केली. मात्र, आता रुग्णच नसल्याने डॉक्टरांची उलाढाल आर्थिक अडचणीत आली आहे.

खासगी डॉक्टरांनी कारोनाला केले ‘कॅश’; कित्येकांचा बेडअभावी मृत्यू
आहे ना कमाल! १,६९७ जणांचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार आठ हजारांवर

परजिल्ह्यांतील प्रवासाला ब्रेक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या आप्तस्वकीयांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एक बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांना आपल्या जिल्ह्यातून परजिल्ह्यांत आधार शोधावा लागला. प्रत्येक जिल्ह्यात बेड उपलब्ध असल्याने परजिल्ह्यांतील प्रवासाला ब्रेक बसला आहे.

कोरोना नियमांत अंत्यसंस्कार

नागपूरसारख्या महानगरातून रुग्ण चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वाशीम आदी ठिकाणी हलविण्यात आलेत. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने घरापासून दूर कोरोना नियमांत अंत्यसंस्कार करण्याची वेळ कित्येकांवर आली. याच वेदना घेऊन हजारो कुटुंबांना पुढील आयुष्य जगावे लागणार आहे.

(Money-earned-by-private-doctors-during-the-Corona-period)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com