आहे ना कमाल! १,६९७ जणांचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार आठ हजारांवर

आहे ना कमाल! १,६९७ जणांचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार आठ हजारांवर

नागपूर : काही दिवसांत कोरोनाबळी (coronavirus) व बाधितांची संख्या कमी झाली असून, शहर व जिल्ह्यात दिलासादायक वातावरण आहे. परंतु, मार्च व एप्रिलमध्ये महापालिकेने शहरातील कोरोनाबळींची दिलेली आकडेवारी (Corona death statistics) आणि अंत्यसंस्काराच्या आकडेवारीत साडेसहा हजारांची तफावत आढळून आली आहे. एवढी तफावत असण्याचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Corona-death-toll-in-Nagpur-is-not-accurate)

एप्रिलमध्ये कोरोनाने कहरच केला. एप्रिलमध्ये महापालिकेच्या आकडेवारीनुसार दररोज २५ ते ५८ पर्यंत मृत्यूची नोंद करण्यात आली. या महिन्यात महापालिकेच्या १६ घाटांवरील दीडशे ओटेही अंत्यसंस्कारासाठी कमी पडले. याशिवाय महापालिकेने डिझेल व एलपीजी शवदाहिनीचाही वापर करीत दररोज ४० पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले. याशिवाय दोन ओट्यांमधील मोकळ्या जागेतही अंत्यसंस्कार करण्यात आले.

आहे ना कमाल! १,६९७ जणांचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार आठ हजारांवर
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

एप्रिलमध्ये शहरातील १६ घाटांवर ६ हजार ३७७ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु, या महिन्यांत महापालिकेने जिल्हा आरोग्य विभागाला शहरातील बळींची दिलेल्या आकडेवारीनुसार १ हजार १९७ बाधितांचा मृत्यू झाला. १ हजार १९७ बाधितांचा मृत्यू झाला तर सहा हजारांवर पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्चमध्येही महापालिकेच्या आकडेवारीनुसार पाचशे मृत्यूची नोंद असून अंत्यसंस्कार मात्र १ हजार ७२५ पार्थिवावर करण्यात आले. मार्च व एप्रिलमध्ये एकूण १ हजार ६९७ बळींची नोंद आहे. त्याचवेळी घाटांवर ८ हजार १०२ अंत्यसंस्कार झाल्याची नोंद महापालिकेकडेच आहे. शहराबाहेरील आतापर्यंतची एकूण बळींची संख्या १ हजार ४१० आहे. मार्च एप्रिलमध्ये ही संख्या दोनशेपेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिलमध्ये शहराबाहेरील मृत्यूमुखी पडलेल्यांचाही शहरातील बळीत समावेश केला तर आठ हजार १०२ पर्यंत अंत्यसंस्कार शक्य होत नाही.

आहे ना कमाल! १,६९७ जणांचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार आठ हजारांवर
राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही

घरी मृत्यूमुखी पडलेले कोरोनाबळी नाहीत?

या काळात मोठ्या प्रमाणात वेळेवर बेड न मिळणे, उपचार न मिळणे, घरी योग्य उपचार न मिळणे यामुळेही अनेकांचा कोरोनाने मृत्यू झाला. परंतु, कुठल्याही रुग्णालयाचे प्रमाणपत्र नसल्याने घरी मृत्यूमुखी पडलेल्यांची कोरोनाबळीत नोंद करण्यात आली नसल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे काही खासगी हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूमुखी पडलेल्या बळींचीही नोंद नसल्याचे सूत्राने नमुद केले.

बळींची संख्या व अंत्यसंस्कार (मनपाच्या आकडेवारीनुसार)

महिना बळी अंत्यसंस्कार

मार्च ५०० १,७२५

एप्रिल १,१९७ ६,३७७

(Corona-death-toll-in-Nagpur-is-not-accurate)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com